महाराष्ट्रातील शेतकरी आणि कृषी विद्यापीठांचे शास्त्रज्ञ यांच्यात संवादच नसल्याची खंत राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी व्यक्त केली. देअर इज टोटल डिसकनेक्ट बिटष्ट्वीन प्रायोरिटीज आॅफ फार्मर्स अँड युनिव्हर्सिटी, अशा शब्दात त्यांनी नाराजी व्यक्त केली. ...
गेल्या २५ वर्षांपासून येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात भरत असलेल्या शेळी बाजारात शेतकºयांची मोठ्या प्रमाणात लूट होत आहे. याकडे बाजार समितीचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. ...
बाभूळगाव तालुक्याच्या देवगाव येथील डॉ. महेश मोहनराव वाघ यांच्या मृत्यूची चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात माजी पोलीस पाटील तथा डॉ. वाघ यांचे वडील मोहनराव शेषरावजी वाघ यांनी कळंब ठाणेदारांना निवेदन देण्यात आले आहे. ...
शहराला पाणीपुरवठा होत असलेल्या वाघाडी नदीतून सिंचनासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा होत आहे. त्यामुळे पुढील काळात घाटंजी शहराचा पाणीप्रश्न गंभीर होण्याची चिन्हे दिसू लागली आहे. ...
स्वच्छ भारत मिशनअंतर्गत घर तेथे शौचालय अभियान राबविले जात आहे. गावातील स्वच्छता व सुंदरता वाढावी यासाठी पाथ्रड गोळे येथील किराणा व्यावसायिकाने अनोखी शक्कल लढविली आहे. घरी शौचालय नसेल तर किराणाच मिळणार नाही, अशी अट त्याने घातली आहे. ...
राज्यातील चारही कृषी विद्यापीठांचे कुलपती असलेल्या महामहीम राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या यवतमाळ दौऱ्याकडे बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. ...
येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभाग आणि इलेक्ट्रिकल विभागाच्या संयुक्त विभागाने ‘नॅक व एनबीए एक्रेडिटेशन’वर सहा दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. ...
नगरपालिका हद्दीत नव्यानेच समाविष्ट झालेल्या लोहारा परिसरातील नागरिकांना मालमत्ता कराच्या नोटीस बजावण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, या भागात यवतमाळ नगरपालिकेची शाळाच नसतानाही नागरिकांना शिक्षण कर आकारण्यात आल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. ...
महामहीम राज्यपाल सी. विद्यासागर राव बुधवारी यवतमाळात येत आहे. त्यानिमित्त नगरपरिषदेने नागपूर मार्गावरील अतिक्रमण काढले. यात मंगळवारी दुपारी तहसील चौक ते शनि मंदिर चौकापर्यंतच्या दुकानांचे शेड काढण्यात आले. ...