कोरेगाव भीमा प्रकरणाचे सूत्रधार अद्यापही मोकाट असून त्यांना अटक करेपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही, अशी कठोर भूमिका सोमवारी बहुजन क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी जाहीर केली. ...
साहित्यिक, कलावंतांचा खरा सन्मान करायचा असेल, तर सरकारने प्रत्येक जिल्हास्तरावर त्यांना सभागृह बांधून द्यावे, अशी सूचना लोकमत एडिटोरिअल बोर्डचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यापुढे येथे मांडली. ...
वीज जोडणीच्या प्रतीक्षेत चार वर्षापासून असलेल्या एका शेतकऱ्याला वीज जोडणी तर मिळालीच नाही उलट वीज वितरण कंपनीने त्यांना चक्क २६ हजार रुपयाचे वीज बिल पाठविले. ...
संत गाडगेबाबा आणि डॉ.पंजाबराव देशमुखांवर मी चित्रपट केलेत. मात्र राष्ट्रसंतांवर चित्रपट निमिर्तीचे स्वप्न अजूनही पूर्ण होऊ शकले नाही, अशी खंत प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक राजदत्त यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. ...
समाज जीवनात अनेक स्थित्यंतरे होत असतात. या घटना साहित्यकार सातत्याने लेखणीतून मांडतात. त्याचा परिणाम समाज जीवनावर होत असतो, त्यामुळेच त्यांचे समाजात मोठे स्थान आहे, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केले ...
आस्मानी आणि सुलतानी संकटाने शेतकरी पुर्ता मेटाकुटीस आला आहे. आता विकायलाही काही नसल्याने अनेक शेतकरी आपल्या शेतातील सुपीक माती विटभट्टी चालकांना विकत असल्याचे महागाव तालुक्यातील बिजोरा परिसरात दिसत आहे. ...
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर येथील तिरंगा चौकात सुरू असलेल्या चक्री धरणे आंदोलनात रविवारी तिसऱ्या दिवशी शेतकऱ्यांनी मुंडण करून शासनाचा निषेध केला. शेतकरी संघर्ष समितीच्या पुढाकारात पुसद विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांनी आंदोलन केले. ...
जिल्हा परिषदेच्या तब्बल ७६ शाळा पुढील शैक्षणिक सत्रापासून बंद होण्याचा धोका वाढला आहे. या शाळांमध्ये केवळ दहाच विद्यार्थी असल्याने त्या बंद पडण्याची शक्यता आहे. ...