संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी यवतमाळ शहराला पाणीटंचाईग्रस्त क्षेत्र म्हणून बुधवारी घोषित केले. यामुळे शहरातील सर्व जलस्रोतांचा वापर केवळ पिण्याच्या पाण्यासाठीच करता येणार आहे. ...
सासूच्या निधनानंतर अनुकंपा नोकरीचा वारसदार मुलगा की सून ? या प्रश्नाच्या अनुषंगाने मुंबई ‘मॅट’मध्ये कुटुंबाच्या व्याख्येवर अनेक तास खल चालला. अखेर ‘मॅट’ने निर्णय घेण्याच्या सूचना शासनाला दिल्या. ...
युवकांना रोजगार मिळवून देण्यासाठी शासन प्राधान्य देत आहे. मात्र विद्यार्थ्यांनी देखील पदवीधर होताना कौशल्यधिष्ठीत अभ्यासक्रम निवडावा असे आवाहन गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी येथे केले. ...
येथील माणुसकीची भिंतच्या माध्यमातून नि:स्वार्थपणे गरजुंना मदत करणाºया सदस्यांचा उत्कृष्ट सामाजिक कार्याबद्दल नगराध्यक्ष अनिताताई नाईक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ...
पुसद वन विभागांतर्गत उमरखेड वन परिक्षेत्रातील मौजे चुरमुरा परिसरात सहा हेक्टर वनजमिनीत कंत्राटदारांनी अवैधरीत्या गौण खनिजाचे उत्खनन केल्याची बाब भूमिअभिलेखच्या मोजणीत सिद्ध झाली आहे. ...
नेर तालुक्यातील पिंपरी कलगा येथे अवैध दारू विक्रीला उधाण आले आहे. या विरोधात मंगळवारी स्वामिनी बचत गटासह सहा गटांच्या महिलांनी यवतमाळात धडक दिली. जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हा पोलीस अधीक्षकांना यावेळी निवेदन देण्यात आले. ...
जिल्ह्यात यावर्षी अत्यल्प पाऊस झाला. या संकटाचा सामना सर्वांनी मिळून करायचा आहे. त्यासाठी ‘सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा’ ही एक चांगली संधी आहे. या माध्यमातून जिल्ह्यात जलसंधारणाचे अतिशय चांगले काम करून दुष्काळाचा सामना करण्यासाठी सज्ज आहोत,..... ...
येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रा.मकरंद शहाडे यांना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने आचार्य पदवी प्रदान केली. कॉम्प्युटर सायन्स अॅन्ड इंजिनिअरिंगमधील ‘अ रिलायबल पॉवर रुटींग स्किम फॉर मोबाईल अॅड-होक नेटवर्क’ असा त्यांच्या संशोध ...
विदर्भातील पूर्ण झालेल्या लघु सिंचनाच्या कामांची १७० कोटी रुपयांची देयके गेल्या चार महिन्यांपासून औरंगाबाद येथे जलसंधारण मंडळात पडून आहेत. या देयकांच्या मंजुरीसाठी जाणीवपूर्वक अडवणुकीचे धोरण राबविले जात असल्याची विश्वसनीय माहिती आहे. ...