ऑक्सिजन साेडा, साधा जनरेटरही नाही, काेविड केअर सेंटरमध्ये रुग्ण घामाघूम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 05:00 IST2021-04-26T05:00:00+5:302021-04-26T05:00:02+5:30
काेविड केअर सेंटर व डेडिकेटेड काेविड हेल्थ सेंटरमध्ये मूलभूत सुविधांचा वाणवा आहे़ या ठिकाणी इनर्व्हटर देण्यात यावे असा प्रस्ताव तालुका आराेग्य अधिकाऱ्यांकडून देण्यात आला आहे़ याला अजूनपर्यंत मान्यता मिळली नाही़ त्यामुळे डाॅक्टर, आराेग्य कर्मचारी व रुग्णांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. काेणत्याही रुग्णाला उपचारा व औषधाइतकेच तेथील वातावरण महत्त्वाचे ठरते.

ऑक्सिजन साेडा, साधा जनरेटरही नाही, काेविड केअर सेंटरमध्ये रुग्ण घामाघूम
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्वच तालुका मुख्यालयी काेविड केअर सेंटर उघडण्यात आले आहेत़ त्या ठिकाणी साैम्य लक्षणे असलेल्या काेराेना रुग्णांना ठेवण्यात येत आहे़ तर डेडीकेटेड काेविड हेल्थ सेंटरवर मध्यम लक्षणे असलेले रुग्ण आहेत़ शासकीय काेविड रुग्णालयात गंभीर रुग्णांना ठेवले आहे़ या रुग्णांना प्रचंड उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे़ येथे वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर काेणतीच पर्यायी व्यवस्था नाही़ त्यामुळे रुग्णांना प्रचंड उकाडा सहन करावा लागत आहे़
काेविड केअर सेंटर व डेडिकेटेड काेविड हेल्थ सेंटरमध्ये मूलभूत सुविधांचा वाणवा आहे़ या ठिकाणी इनर्व्हटर देण्यात यावे असा प्रस्ताव तालुका आराेग्य अधिकाऱ्यांकडून देण्यात आला आहे़ याला अजूनपर्यंत मान्यता मिळली नाही़ त्यामुळे डाॅक्टर, आराेग्य कर्मचारी व रुग्णांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. काेणत्याही रुग्णाला उपचारा व औषधाइतकेच तेथील वातावरण महत्त्वाचे ठरते. असह्य वातावरणात उपचार केले जात असले तर रुग्णावर त्याचा मानसिक आघात हाेतो. काेणत्याही सामान्य माणसाला काेविड सेंटरमध्ये पाच मिनिट थांबता येत नाही अशी स्थिती आहे. उकाडा वाढत असल्याने रुग्णांची हाल हाेत आहे.
एप्रिल तापला
- गेल्या चार दिवसांपासून प्रचंड उकाडा जाणवत आहे. तापमान ४२ अंशावर पाेहाेचले आहे.
- मार्चमध्ये उन्हाचा पारा हा ३९ अंशावर आतमध्ये हाेता. त्यात आणखी वाढ हाेण्याची शक्यता आहे.
- काेराेना रुग्णांना श्वास घेण्यास त्रास हाेताे़ त्यात गरमीमुळे स्थिती असह्य हाेत आहे.
काेराेनापेक्षा उकाडा जीवघेणा
- काेराेना आजारापेक्षा काेविड केअर सेंटरवर उकाडा असह्य हाेत आहे़ येथे काेणतीच सुविधा नाही. एकवेळ औषध मिळाले नाही तरी चालेल; पण उकाड्यामुळे जीव नकाेसा झाला आहे़ येथे रुग्णांना गरमीपासून आराम मिळेल, अशी व्यवस्था तत्काळ करावी किंवा घरी राहून तरी उपचार दिला जावा़
- एक रुग्ण
- काेराेनाचे दुखणे कायम असताना आता गरमी जीवावर उठली आहे. येथे जनरेटर, इनर्व्हटरची काेणतीच सुविधा नाही. दिवस काढणे कठीण झाले आहे़ वीज पुरवठा काही तास खंडित झाला स्थिती अतिशय भयंकर हाेते़ प्रचंड गरमीमुळे येथे थांबावे वाटत नाही़ उलट अशा वातावरणामुळे आणखी प्रकृती बिघडण्याचा धाेका निर्माण झाला आहे़
- एक रुग्ण