रेतीचे ओव्हरलोड ट्रक पकडले

By Admin | Updated: June 3, 2015 00:03 IST2015-06-03T00:03:13+5:302015-06-03T00:03:13+5:30

तहसील विभागाने सापळा रचून केलेल्या कारवाईत रेतीचे नऊ ओव्हरलोड ट्रक मंगळवारी पकडले.

The overload truck on the sand was seized | रेतीचे ओव्हरलोड ट्रक पकडले

रेतीचे ओव्हरलोड ट्रक पकडले

नेर तहसील विभागाचा सापळा : कारवाईचा चेंडू आरटीओच्या कोर्टात
नेर : तहसील विभागाने सापळा रचून केलेल्या कारवाईत रेतीचे नऊ ओव्हरलोड ट्रक मंगळवारी पकडले. दरम्यान, कारवाईच्या भीतीने ट्रकचालकांनी स्थानिक नेहरू महाविद्यालय परिसरात रेती उतरवून पळ काढला. पुढील कारवाई आरटीओच्या अहवालानंतर केली जाणार असल्याची माहिती नायब तहसीलदार शरद सराफ यांनी दिली.
बाभूळगाव येथून मांगलादेवी-मांगुळ मार्गे रेतीचे ओव्हरलोड ट्रक येत असल्याची माहिती तहसील विभागाला मिळाली. तहसीलदार पी.आर. ताकसांडे यांच्या मार्गदर्शनात नायब तहसीलदार शरद सराफ, तलाठी दीपक अवधुत, एम.एस. निंबटे यांनी सापळा रचून नऊ ट्रक ताब्यात घेतले. सदर ट्रक नेर येथे आणत असताना चालकांनी त्यातील रेती नेहरू महाविद्यालयाच्या परिसरात उतरवून पळ काढला.
ताब्यात घेतलेल्यापैकी एका ट्रकचालकाने ट्रकसह पळण्याचा प्रयत्न केला. मात्र पाठलाग करून ताब्यात घेण्यात आले. पकडण्यात आलेले ट्रक योगेश रॉय, सुभाष भोयर, लाल खाँ गुलाब खाँ, कुणाल पानबुडे, नरेश जैन, अमोल तंबाखे, रवी जयसिंगपुरे, शोएब खाँ यांच्या मालकीचे असल्याची माहिती तहसील विभागाने दिली. दरम्यान, कारवाईसाठी तहसील विभागाने आरटीओ अधिकाऱ्यांना पाचारण केले होते. पुढील कारवाईची प्रक्रिया त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. या विभागाच्या अहवालानंतर तहसील विभागाकडूनही कारवाई केली जाईल, असे तहसीलदार पी.आर. ताकसांडे यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: The overload truck on the sand was seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.