लोकशाही दिनातही तक्रार बेदखल

By Admin | Updated: January 18, 2017 00:08 IST2017-01-18T00:08:03+5:302017-01-18T00:08:03+5:30

पाणलोटअंतर्गत करण्यात आलेल्या नाला सरळीकरणाचे पाणी थेट शेतकऱ्याच्या शेतात शिरून नुकसान होत आहे.

Overeating of the complaint on democracy day | लोकशाही दिनातही तक्रार बेदखल

लोकशाही दिनातही तक्रार बेदखल

धनोडाचा शेतकरी : शेतात शिरले नाला सरळीकरणाचे पाणी
महागाव : पाणलोटअंतर्गत करण्यात आलेल्या नाला सरळीकरणाचे पाणी थेट शेतकऱ्याच्या शेतात शिरून नुकसान होत आहे. याबाबत लोकशाही दिनात तक्रार करूनही न्याय मिळाला नाही. त्यामुळे धनोडा येथील रामराव भेंडे यांची शेती पडिक पडण्याची भीती आहे.
महागाव तालुक्यात २०१६ मध्ये अतिवृष्टी झाली होती. त्याच काळात पाणलोटद्वारे नाला सरळीकरण करण्यात आले. त्यावेळी अधिकाऱ्यांनी नाली भलतीकडेच खोदून नाला सरळ केला. त्यामुळे भेंडे यांच्या शेतातील पीक खरडून गेले. याबाबत त्यांनी महागाव तहसीलदारांकडे निवेदने केली. तलाठीसुद्धा त्यांच्या शेतात येऊन गेले. परंतु फायदा झाला नाही. त्यांनी यवतमाळच्या लोकशाही दिनात तक्रार केली. ८२ क्रमांकाचे टोकन मिळाले. परंतु अद्याप कारवाई झाली नाही. गत पाच महिन्यांपासून रामराव भेंडे न्यायासाठी शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवित आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Overeating of the complaint on democracy day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.