जिल्हाधिकारी कक्षेबाहेर 3 शेतकरी प्यायले विष
By Admin | Updated: April 27, 2017 15:22 IST2017-04-27T15:22:37+5:302017-04-27T15:22:37+5:30
यवतमाळ जिल्हाधिकारी कक्षेबाहेरील आवारात तीन शेतक-यांनी विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे हे तिघंही भाऊ आहेत.

जिल्हाधिकारी कक्षेबाहेर 3 शेतकरी प्यायले विष
ऑनलाइन लोकमत
यवतमाळ, दि. 27 - जिल्हाधिकारी कक्षेबाहेरील आवारात तीन शेतक-यांनी विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे हे तिघंही भाऊ आहेत.
शेतीवर बेकायदा ताबा घेतल्याप्रकरणी न्याय मिळत नसल्याने दारव्हा तालुक्याच्या डोल्हारी येथील उमेश रामचंद्र गौतम (२८), उत्तम रामचंद्र गौतम (३२) व कुंदन रामचंद्र गौतम या तीन भावांनी जिल्हाधिका-यांच्या कक्षेबाहेरील परिसरात विष प्राशन केले.
त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत.