आणखी दोघे कोरोना पॉझिटिव्ह आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 05:00 IST2020-04-20T05:00:00+5:302020-04-20T05:00:24+5:30
येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला रविवारी नागपूरच्या प्रयोगशाळेतून एकंदर ३७ जणांच्या नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला. त्यापैकी ३५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहे. तर दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हे दोघेही इतर पॉझिटिव्ह लोकांच्या संपर्कात आल्यामुळे बाधित झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. आता या नव्या रुग्णांवरही मेडिकलच्या आयसोलेशन वार्डात उपचार सुरू करण्यात आले आहे.

आणखी दोघे कोरोना पॉझिटिव्ह आढळले
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : दहा पैकी चार कोरोना बाधितांना पूर्णपणे ठणठणीत बरे करून मेडिकल प्रशासनाने शनिवारी त्यांना घरी सोडले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या घटून सहा झालेली असताना रविवारी आणखी दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे मेडिकलमध्ये दाखल असलेल्या कोरोनाबाधितांची रुग्ण संख्या आता आठ झाली आहे.
येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला रविवारी नागपूरच्या प्रयोगशाळेतून एकंदर ३७ जणांच्या नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला. त्यापैकी ३५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहे. तर दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हे दोघेही इतर पॉझिटिव्ह लोकांच्या संपर्कात आल्यामुळे बाधित झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. आता या नव्या रुग्णांवरही मेडिकलच्या आयसोलेशन वार्डात उपचार सुरू करण्यात आले आहे. तर त्यांच्या संपर्कात आणखी कुणी आले आहेत काय याचाही शोध घेतला जात आहे.
आयसोलेशन वार्डात सद्यस्थितीत एकूण ४६ जण भरती आहे. त्यापैकी रविवारी १६ जणांचे नमुने तपासणीसाठी नागपूरच्या प्रयोगशाळेकडे रवाना करण्यात आले. गेल्या २४ तासात १४ जणांना आयसोलेशन वार्डात भरती करण्यात आल्याचे वैद्यकीय प्रशासनाने सांगितले. दरम्यान जिल्ह्यात होम क्वारंटाईन असलेल्या लोकांची संख्या ७६८ असून ३७ जणांना संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. पॉझिटिव्ह असलेल्या लोकांच्या संपर्कात जे आले असतील अशा नागरिकांनी स्वत:हून यंत्रणेसमोर येऊन आपली वैद्यकीय तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
यवतमाळात सील करण्यात आलेल्या परिसरात सोमवारपासूनही निर्बंध कायम राहणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी दिली.