शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Pawar : 'आघाडीमध्ये संधी मिळाल्यास आमच्याकडे जयंत पाटलांसारखा अनुभवी चेहरा'; रोहित पवारांचं सूचक विधान
2
बांगलादेशची Super 8 च्या दिशेने कूच, नेदरलँड्सची हार अन् माजी विजेत्या श्रीलंकेचे संपले आव्हान
3
मोठी बातमी! टीम इंडियाचे दोन शिलेदार T20 World Cup सोडून मायदेशात परतणार
4
'दीड वर्षापूर्वी विमानतळाच्या कामासाठी आलो होतो, आता मंत्री होऊन आलो'; मुरलीधर मोहोळांनी सांगितला 'तो' किस्सा
5
राहुल गांधी रायबरेली की वायनाड सोडणार; दुसरा उमेदवार कोण? नाव आलं समोर
6
स्टार एअरची नागपूर-नांदेड विमानसेवा २७ पासून; सोमवार, मंगळवार, गुरुवार, शुक्रवार चार दिवस असणार
7
कुवैतमध्ये आगीत होरपळून 45 भारतीयांचा मृत्यू; मृतदेह आणण्यासाठी वायुसेनेचे विमान पोहोचले...
8
शाकिब अल हसन झळकला, वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला; नेदरलँड्ससमोर उभे केले तगडे लक्ष्य
9
दहशतवादावर पीएम मोदींचा प्रहार; 21 जून रोजी पंतप्रधान थेट जम्मू-काश्मीरला जाणार...
10
“रोहित पवारांना CM व्हायचे, पण जयंत पाटील करेक्ट कार्यक्रम करतील”; अजित पवार गटाचा दावा
11
बांगलादेशच्या फलंदाजाचा डोळा थोडक्यात वाचला; इगलब्रेचच्या अफलातून झेलने पॉवर प्ले गाजला
12
एकाच मोबाईलमध्ये २ सिम वापरणे महागणार, भरावे लागणार शुल्क; TRAI नियमात करणार बदल
13
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी; POCSO प्रकरणात न्यायालयाचा निर्णय
14
Super 8 सोबतच ८ संघ T20 World Cup 2026 साठी पात्र ठरणार; मग पाकिस्तानचं काय होणार?
15
दोनदा घटस्फोट, जुळ्या मुलींची आई चाहत खन्ना पुन्हा प्रेमात? चार वर्ष लहान अभिनेत्याला करतेय डेट
16
सुनेत्रा अजित पवारांनी अखेर संसद गाठलीच; राज्यसभेवर बिनविरोध, बारामतीत आता तीन खासदार
17
Fact Check : लोकसभेवर ११० मुस्लिम खासदार निवडून आल्याचा दावा खोटा
18
यानंतर उपोषण नाही, निवडणुकीत उतरणार अन् नावं घेऊन उमेदवार पाडणार: मनोज जरांगे
19
याला म्हणतात धमाका...! ₹७५ रुपयांचा शेअर दहाच महिन्यांत २३०० वर पोहोचला; गुंतवणूकदार मालामाल
20
सौरभ नेत्रावळकरच्या १० मिनिटांच्या मुलाखतीसाठी पत्रकारांनी अर्शदीपसोबत केलं असं काही... 

बालगृहातील अनाथ मुले जगताहेत उपेक्षेचे जीणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2020 5:00 AM

बालगृहातील मुलांचे हाल होऊ नये यासाठी त्यांना घेऊन जाण्याच्या सूचना नातेवाईकांना केल्या. मात्र लॉकडाऊनमुळे आमच्यापुढेच जगण्याचा प्रश्न असल्याची व्यथा काही लोकांनी मांडली. या बालकांना घेऊन जाण्यास स्पष्ट नकार देण्यात आला. शासन पैसा देत नाही. नातेवाईक घेऊन जात नाही, यामुळे ४० बालकांचे संगोपन करताना अनेक अडचणी निर्माण होत आहे.

ठळक मुद्देलॉकडाऊनने प्रश्न वाढले, अन्न, वस्त्र उधारीवर, दोन हजारात खर्चाची मोठी यादी, दीड वर्षांपासून अनुदान नाही

किशोर वंजारी ।लोकमत न्यूज नेटवर्कनेर : कुणाचे मातृ-पितृ छत्र हरविलेले, कुणाच्या आई-वडिलांचा पत्ता नाही, तर कुणाला मायबापांनी सोडून दिलेले, अशा अनाथांना मागील दीड वर्षांपासून उपेक्षेचे जीणे जगावे लागत आहे. वटफळीतील अशोका बालगृहातील अनाथांच्या वाट्याला सतत दु:खच आले आहे.महाबोधी बहुद्देशीय संस्था अमरावतीद्वारा संचालित अशोक बालगृहात ४० अनाथांचे संगोपन केले जाते. शासनाकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळे या अनाथांच्या जगण्याचा प्रश्न आता निर्माण झाला आहे. प्रा. भदन्त सुमेधबोधी महाथेरो हे सदर बालगृह चालवितात. प्रत्येक मुलामागे दरमहा दोन हजार रुपये दिले जाते. यातून इमारत भाडे, मुलांचे कपडे, औषधोपचार, कर्मचाऱ्यांचे मानधन आदी खर्च संस्थेला भागवावा लागतो. पूर्वी या बालगृहाला मिळत असलेले धान्यही शासनाने बंद केले आहे. आता तर अनुदानही मागील दीड वर्षांपासून थांबले. उधारीवर किराणा, कपडे आणून या बालकांचे पालनपोषण केले जात आहे. आई-वडिलांच्या प्रेमाला मुकलेल्या या मुलांना बालगृहात मायेची ऊब मिळाली. मात्र आता प्रशासनाच्या लालफितशाहीमुळे त्यांना मोठ्या कठीण प्रसंगाला सामोरे जावे लागत आहे. संस्थेकडून शक्य तितके प्रयत्न होत असले तरी त्यालाही मर्यादा आहे. त्यामुळे प्रशासनाने अनुदानाचा प्रश्न मार्गी लावणे हेच त्यावर औषध आहे.बालगृहातील या मुलांवर चांगले संस्कार होत आहे. अनेक कलागुण आणि शिक्षणाची आवड त्यांच्यात आहे. अशावेळी त्यांना शासनाकडून प्रोत्साहन आणि बळ मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.नातेवाईकही नेण्यास तयार नाहीबालगृहातील मुलांचे हाल होऊ नये यासाठी त्यांना घेऊन जाण्याच्या सूचना नातेवाईकांना केल्या. मात्र लॉकडाऊनमुळे आमच्यापुढेच जगण्याचा प्रश्न असल्याची व्यथा काही लोकांनी मांडली. या बालकांना घेऊन जाण्यास स्पष्ट नकार देण्यात आला. शासन पैसा देत नाही. नातेवाईक घेऊन जात नाही, यामुळे ४० बालकांचे संगोपन करताना अनेक अडचणी निर्माण होत आहे. बालगृहातील अनेक मुले लहानाची मोठी झाली. त्यांच्यासाठीचा खर्च वाढत गेला आहे. शासनाकडून मिळणारे अनुदान तोकडे पडते, कसेतरी भागवावे लागते, अशी खंत प्राचार्य भदन्त सुमेधबोधी महाथेरो यांनी व्यक्त केली.स्मरणपत्राला केराची टोपलीबालगृहातील मुलांच्या संगोपनासाठी उधार, उसणवार करावी लागत आहे. हा प्रश्न महिला बाल कल्याण विभागाकडे वारंवार मांडण्यात आला. तरीही गेली दीड वर्षांपासून अनुदान दिलेले नाही. शासनस्तरावर अनुदानाचा प्रश्न तत्काळ निकाली काढला जावा, असे अशोक बालगृहाचे अध्यक्ष प्रा. सुमेधबोधी महाथेरो यांनी सांगितले.

टॅग्स :Governmentसरकार