गायन स्पर्धेत अर्णवी प्रथम
By Admin | Updated: March 6, 2017 01:25 IST2017-03-06T01:25:10+5:302017-03-06T01:25:10+5:30
भारतीय नृत्य व संगीत संस्थेतर्फे सेलम (तामिळनाडू) येथे राष्ट्रीयस्तरावरील गायन स्पर्धा घेण्यात आली.

गायन स्पर्धेत अर्णवी प्रथम
यवतमाळ : भारतीय नृत्य व संगीत संस्थेतर्फे सेलम (तामिळनाडू) येथे राष्ट्रीयस्तरावरील गायन स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये यवतमाळ पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी अर्णवी अविनाश बोरीकर हिला प्रथम क्रमांकासह सुवर्णपदक प्राप्त झाले. जूनमध्ये काठमांडू येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ती प्रतिनिधित्व करणार आहे. तिला अपर्णा शेलार, नाठार आदींचे मार्गदर्शन लाभत आहे.