जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी ‘युफोरिया-१५’ चे आयोजन
By Admin | Updated: January 25, 2015 23:28 IST2015-01-25T23:28:43+5:302015-01-25T23:28:43+5:30
येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘युफोरिया-१५’ या चार दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार २७ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता

जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी ‘युफोरिया-१५’ चे आयोजन
यवतमाळ : येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘युफोरिया-१५’ या चार दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार २७ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
प्रमुख पाहुणे म्हणून यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड, आमदार मदन येरावार उपस्थित राहणार आहे. उद्घाटन समारंभानंतर दुपारी ३ वाजता विद्यार्थ्यांच्या क्रीडा पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. त्यानंतर कला प्रदर्शन, कवी संमेलन, वादविवाद स्पर्धा तसेच सायंकाळी नृत्य, नाट्य स्पर्धा आणि जेडीआयईटी रॉक बँड ‘द लॉस्ट ग्रॅव्हीटी’ अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
स्नेहसंमेलनाच्या दुसऱ्या दिवशी २८ जानेवारी रोजी दुपारी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा, पालक सभा, नामांकित माजी विद्यार्थ्यांचा सत्कार आणि महाविद्यालयाद्वारे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी नाट्य व नृत्य स्पर्धा, जेडीआयईटी अभि तक आणि रंगारंग फॅशन शो आदी कार्यक्रम आयोजित आहे. २९ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता विद्यापीठ परीक्षेत उत्कृष्ट यश संपादन करून महाविद्यालयाची मान उंचावणारे विद्यार्थी, ‘सर्वोत्तम विद्यार्थी व सर्वोत्तम कर्मचारी’ पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जवाहरलाल दर्डा एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष खासदार विजय दर्डा राहणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध अभिनेते श्रेयस तळपदे, प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर उपस्थित राहणार आहे. त्यानंतर दुपारी २ वाजता नाटिका, नृत्य, सायंकाळी फिशपॉन्ड आणि आर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले आहे.
संमेलनाच्या समारोपीय दिवशी ३० जानेवारी रोजी दुपारी ३.३० वाजता संमेलनातील सांस्कृतिक कार्यक्रमाचे बक्षीस वितरण, एसआरसी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ व सायंकाळी मेकिंग आॅफ युफोरियाचे आयोजन केले आहे. सायंकाळी ६ वाजता ‘सिंफोनिया’ हा म्युझिक, डान्स आणि कॉमेडी शो आयोजित आहे. या मैफिलीत इंडियन आॅयडॉल फेम अमेय दाते, प्रसिद्ध गायिका अमृता नातू, एका पेक्षा एक व अप्सरा आली फेम नृत्यांगणा सुकन्या कलान, विनोदी अभिनेता शंतनू ठेंगळी सहभागी होणार आहे. यशस्वीतेसाठी संस्थेचे सचिव किशोर दर्डा, प्राचार्य डॉ. अविनाश कोल्हाटकर यांच्या मार्गदर्शनात युफोरिया संयोजक, विद्यार्थी सरचिटणीस, सांस्कृतिक सचिव आणि विद्यार्थी परिश्रम घेत आहे. (नगर प्रतिनिधी)