‘पोक्सो’तील आरोपीला वाचविण्यासाठी पीडितेच्या जन्मतारखेत खाडाखोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 05:00 AM2021-02-28T05:00:00+5:302021-02-28T05:00:00+5:30

न्यायालयाने पोक्सो प्रकरणातील निकालाच्या प्रती योग्य कारवाईसाठी यवतमाळचे जिल्हाधिकारी, पांढरकवडा नगर परिषदेचे मुख्याधिकारी आणि पांढरकवडा पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना पाठविल्या आहेत. पांढरकवडा पोलीस ठाण्यात २८ मे २०१५ रोजी बारावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून निकेश नामक २० वर्षीय युवकावर भादंवि ३४१, ३५४, ३५४ (अ), ५०६, ३४ तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक (पोक्सो) कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता.

In order to save the accused in 'Pokso', the date of birth of the victim was changed | ‘पोक्सो’तील आरोपीला वाचविण्यासाठी पीडितेच्या जन्मतारखेत खाडाखोड

‘पोक्सो’तील आरोपीला वाचविण्यासाठी पीडितेच्या जन्मतारखेत खाडाखोड

Next
ठळक मुद्देपांढरकवडा सत्र न्यायालयाकडून गंभीर दखल : नगरपरिषद, ग्रामपंचायतीच्या संबंधित दोषींवर गुन्हे नोंदविण्याचे आदेश, सीओ, बीडीओ, कलेक्टरला पत्र

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : बाल लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यातील (पोक्सो) आरोपीला वाचविण्यासाठी पांढरकवडा नगर परिषद आणि तालुक्यातील एका ग्रामपंचायतीच्या जन्म-मृत्यू अभिलेख्यात खाडाखोड करण्यात आल्याचा गंभीर प्रकार पांढरकवडा येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. बी. नाईकवाड यांच्या निदर्शनास आला. न्यायालयाने त्याची दखल घेऊन यातील आरोपीला मदत करण्यासाठी खाडाखोड करणाऱ्या संबंधितांचा शोध घ्यावा आणि चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, असे आदेश १६ फेब्रुवारी २०२१ रोजी जारी केले आहेत. 
न्यायालयाने पोक्सो प्रकरणातील निकालाच्या प्रती योग्य कारवाईसाठी यवतमाळचे जिल्हाधिकारी, पांढरकवडा नगर परिषदेचे मुख्याधिकारी आणि पांढरकवडा पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना पाठविल्या आहेत. पांढरकवडा पोलीस ठाण्यात २८ मे २०१५ रोजी बारावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून निकेश नामक २० वर्षीय युवकावर भादंवि ३४१, ३५४, ३५४ (अ), ५०६, ३४ तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक (पोक्सो) कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता. या प्रकरणात आणखी एक आरोपी होता. मात्र खटल्यादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पांढरकवडा येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. बी. नाईकवाड यांच्या पुढे हा खटला चालला. फिर्यादी युवती अल्पवयीन नव्हती हे दाखविण्याचा प्रयत्न झाला. त्यासाठी तिच्या जन्मतारखेच्या दाखल्यात खाडाखोड करण्यात आली. संशय आल्याने न्या. नाईकवाड यांनी पांढरकवडा नगर परिषद आणि संबंधित ग्रामपंचायतीचे जन्म-मृत्यूचे रेकॉर्ड मागविले. तेव्हा त्यात नावात खाडाखोड आढळून आली. 
दोषींचा शोध घेण्याचे आदेश
पोक्सोतील आरोपीला वाचविण्यासाठी पांढरकवडा नगर परिषदच्या जन्म-मृत्यू नोंदणी विभागातील आणि आरोपी रहिवासी असलेल्या संबंधित ग्रामपंचायतीमधील कुणी तरी कर्मचारी मदत करीत असल्याचे रेकॉर्डवरील खाडाखोडीवरून न्यायालयाच्या निदर्शनास आले. रेकॉर्डवर खाडाखोड करणाऱ्या नगर परिषद व संबंधित ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा शोध घ्या, त्याची चौकशी करा व तातडीने त्याच्यावर गुन्हे दाखल करा, असे आदेश अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. बी. नाईकवाड यांनी नगर परिषद, पंचायत समिती, प्रशासन व जिल्हा दंडाधिकाऱ्यांना दिले आहेत. न्यायालयाच्या या आदेशाने संबंधित यंत्रणेत खळबळ निर्माण झाली आहे.

पीडितेच्या आईला जुळ्या मुली झाल्या, मरण पावल्या, त्याचाही घेतला आधार
 फिर्यादी तरुणीच्या आईला १९९६ मध्ये जुळ्या मुली झाल्या. मात्र, दोन दिवसांतच त्या दगावल्या. त्यांच्या जन्माची नोंद पांढरकवडा नगर परिषदेमध्ये आहे. मात्र त्याचाच आधार घेऊन फिर्यादी तरुणीचा तेथे जन्म दाखविला. तिचे वय तेथे जास्त दाखविण्याचा प्रयत्न केला. 
 संशय निर्माण झाल्याने यातील आरोपीला सत्र न्यायालयाने निर्दोष सोडले गेले. 
 

 

Web Title: In order to save the accused in 'Pokso', the date of birth of the victim was changed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.