ले-आउटमधील तारेचे कुंपण हटविण्याचे आदेश

By Admin | Updated: July 26, 2015 02:24 IST2015-07-26T02:24:40+5:302015-07-26T02:24:40+5:30

शहरालगतच्या गणेशपूर गावाजवळ नव्याने निर्माण झालेल्या ले-आऊटमधील १२ मीटर रूंदीचा रस्ता

Order for deletion of a wire fence in the layout | ले-आउटमधील तारेचे कुंपण हटविण्याचे आदेश

ले-आउटमधील तारेचे कुंपण हटविण्याचे आदेश

शेतकऱ्याच्या उपोषणाची सांगता : रस्ता मोकळा करून देण्याची होती मागणी, गणेशपूर येथील प्रकार
वणी : शहरालगतच्या गणेशपूर गावाजवळ नव्याने निर्माण झालेल्या ले-आऊटमधील १२ मीटर रूंदीचा रस्ता ले-आऊटधारकाने काटेरी कुंपण करून अडविला होता. त्यामुळे आनंद बोढाले यांना शेतात जाण्यास अडथळा निर्माण झाला. तसेच एका इंग्रजी शाळेतील विद्यार्थ्यांनाही बसद्वारे शाळेत जाता येत नव्हते. हा रस्ता मोकळा करून देण्यासाठी बोढाले तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते. अखेर चौथ्या दिवशी त्यांची प्रकृती खालावल्यामुळे प्रशासनाने दखल घेतली व ले-आऊटमधील रस्त्यावर केलेले कुंपन २४ तासांच्या आत हटवावे, असा आदेश ले-आऊटधारकाला बजावला. त्यानंतर बोढाले यांनी उपविभागीय अधिकारी शिवानंद मिश्रा यांच्याहस्ते शरबत घेऊन उपोषण सोडले.
गणेशपूर येथील शेत गट क्रमांक ३/१-ब मध्ये महावीर डेव्हलपर्सने ले-आऊट टाकले. या शेताच्या पलीकडे आनंद बोढाले यांचे शेत गट क्र. २/१, २/२ आहे. या शेतात जाण्यासाठी सदर ले-आऊटमधील १२ मीटर रूंदीचा रस्ता टाकण्यात आला. मात्र तो रस्ता महावीर डेव्हलपर्सच्या भागीदारांनी काटेरी तारेचे कुंपण करून बंद केला. तो रस्ता मोकळा करून देण्यासाठी आनंद बोढाले यांनी तहसीलदार, उपविभागीय अधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. मात्र त्यांच्या तक्रारीची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे आनंद बोढाले यांनी तहसील कार्यालयासमोर २० जुलैपासून आमरण उपोषण सुरू केले. उपविभागीय अधिकाऱ्यांनी याप्रकरणी सुनावणी घेऊन दोन्ही बाजूकडील युक्तिवाद ऐकून घेतला व रस्त्यावर केलेले कुंपन बेकायदेशीर असल्याचे निष्पन्न झाल्यावरून सदर कुंपम २४ तासांच्या आत काढून टाकावे, असा आदेश पारित केला.
यावरून तहसीलदारांनी महावीर डेव्हलपर्सच्या भागीदारांना नोटीस बजावून २४ तासांच्या आत कुंपन काढून टाकण्याची नोटीस दिली. कुंपण न काढल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा ईशारा दिला. तसेच आनंद बोढाले यांनी केलेल्या इतर मागण्यांवरसुद्धा यथोचित कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिले. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Order for deletion of a wire fence in the layout

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.