नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2019 06:00 AM2019-12-14T06:00:00+5:302019-12-14T06:00:18+5:30

जमियत उलामा-ए-हिंदच्यावतीने नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाविरोधात उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. राष्ट्रपतींना पाठविण्यासाठी निवेदन देण्यात आले. शहरातील प्रमुख मार्गाने शांततेत मोर्चा काढण्यात आला. उपविभागीय कार्यालय परिसरात काही मान्यवरांनी मार्गदर्शन केले. या विधेयकाची अंमलबजावणी थांबविण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

Opposition to the Citizenship Amendment Bill | नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला विरोध

नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला विरोध

Next
ठळक मुद्देमुस्लिम समाजातील नागरिकांची धडक : नेर, दारव्हा, राळेगाव, महागाव येथे मोर्चा व निवेदन सादर

लोकमत न्यूज नेटवर्क
नेर : जमियत उलामा-ए-हिंदच्यावतीने येथील जामा मशीदपासून मोर्चा काढण्यात आला. तहसील कार्यालयावर मोर्चा नेऊन निवेदन सादर करण्यात आले. नागरिकत्व सुधारणा कायद्याची अंमलबजावणी थांबविण्याची मागणी नायब तहसीलदार संजय भोयर यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली. यावेळी जमियत उलामा-ए-हिंदचे अध्यक्ष मौलाना रिजवान उल्ला खान, मौलवी उबेद, हाफिज आरिफ, अ‍ॅड. लतिफ मिर्झा, वसीम मिर्झा, मोहम्मद जावेद शेख भोलू, जफर एन. खान, मौलवी रेहमत उल्ला, शोएब खान, रियाज टिक्की, तनवीर खान, जावेद हमीद खान, सलीम मकवानी, शेहबाज तसदीक पठाण, साजीद खान, मुन्ना शेख, इमरान भाई पठाण, जहीर इकबाल, मौलाना आझाद विचार मंचचे अध्यक्ष इस्माईल आझाद, शउर आगा खान, शाहबाज अहेमद, आशीफ खान, बामसेफ बहुजन मुक्ती मोर्चाचे प्रा. पी.एस. आठवले, अशोक खोब्रागडे आदी सहभागी झाले होते.
दारव्हा येथे मोर्चा
दारव्हा : जमियत उलामा-ए-हिंदच्यावतीने नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाविरोधात उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. राष्ट्रपतींना पाठविण्यासाठी निवेदन देण्यात आले. शहरातील प्रमुख मार्गाने शांततेत मोर्चा काढण्यात आला. उपविभागीय कार्यालय परिसरात काही मान्यवरांनी मार्गदर्शन केले. या विधेयकाची अंमलबजावणी थांबविण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. मोर्चामध्ये जमियत उलामा-ए-हिंदचे पदाधिकारी, सदस्य आणि समाजबांधव सहभागी झाले होते.
राळेगाव येथे निवेदन
राळेगाव : नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाविरूद्ध शहरातील मुस्लीम बांधवांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भारत मुक्ती मोर्चा यासह इतर सामाजिक संघटनांनी या निवेदनाला पाठिंबा दिला. यावेळी जमात-ए-उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष मौलाना अजहर काझी, अफसर अली सैयद, बबलू सैयद, विजयराज शेगेकर, प्रकाश खुडसंगे, साजीद शेख, बादशाह काझी, वसीम पठाण, रहेमान कुरेशी, फारूक शेख, जहीरभाई, कय्यूमभाई, बाबूभाई, महेमूदभाई, अल्ताफ शेख, अनिस शेख, अकरम खान, दानिश नूर, फरहान काझी, साहील सैयद, नफिज शेख आदी उपस्थित होते.
महागाव येथे मोर्चा
महागाव : नागरिकत्व सुधारणा विधेयक त्वरित रद्द करावे, या मागणीसाठी येथे मुस्लीम समाज बांधवांतर्फे मोर्चा काढण्यात आला. राष्ट्रपतींना पाठविण्यासाठी निवेदन सादर करण्यात आले. विविध प्रकारच्या घोषणा देत मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. या मोर्चात महागाव शहरासह लगतच्या गावातील मुस्लीम बांधव सहभागी झाले होते.

Web Title: Opposition to the Citizenship Amendment Bill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.