भाजपाविरूद्ध सर्वपक्षीय एकजूट
By Admin | Updated: September 9, 2016 02:38 IST2016-09-09T02:38:43+5:302016-09-09T02:38:43+5:30
बाजार समितीत प्रस्थापित गाडे पाटील गटाविरोधात सर्व पक्षांनी एकजूट केली आहे. गाडेपाटील सध्या भाजपात

भाजपाविरूद्ध सर्वपक्षीय एकजूट
यवतमाळ बाजार समिती : पणनमधून राधेश्याम अग्रवाल बिनविरोध
यवतमाळ : बाजार समितीत प्रस्थापित गाडे पाटील गटाविरोधात सर्व पक्षांनी एकजूट केली आहे. गाडेपाटील सध्या भाजपात असल्याने भाजपाविरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना यांनी परिवर्तन शेतकरी आघाडी केली आहे. नामांकन मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल ४८ जणांनी माघार घेतली. परिवर्तनचे राधेश्याम फुलचंद अग्रवाल यांच्या विरोधात प्रक्रिया मतदारसंघात गाडेपाटील गटाला उमेदवार न मिळाल्याने त्यांची अविरोध निवड होणार आहे.
बाजार समितीच्या १७ जागेसाठी परिवर्तन शेतकरी विकास आघाडी आणि भाजपाकडून उमेदवार देण्यात आले आहे. यातील एक जागा अविरोध होणार असल्याने आता १६ जागेसाठी मतदान घेतले जाणार आहे. ग्रामपंचायत मतदारसंघात चार आणि सेवा सहकारी सोसायटी मतदारसंघात तीन जणांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. जिल्हा मुख्यालयी असलेल्या यवतमाळ बाजार समितीत मागील दोन टर्मपासून गाडेपाटील गटाचे वर्चस्व आहे.
येथे परिवर्तन घडवून आणण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने एकत्र येऊन मोठे आव्हान उभे केले आहे. या स्थितीत गाडे पाटील आपली सत्ता कायम ठेवण्यासाठी आणखी कोणती खेळी करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बाजार समितीची सत्ता राजकीय दृष्ट्या प्रतिष्ठेची मानली जाते. काही झाले तरी या वेळेस पाटील गटाला संधी मिळू नये, असा प्रयत्न सुरू आहे. (कार्यालय प्रतिनिधी)