शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

मुलांनो, उन्हाळी सुटीत बना शास्त्रज्ञ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 21:29 IST

उपजत कुतूहल आणि शोधक वृत्ती असणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना यंदाच्या उन्हाळ्यात चक्क शास्त्रज्ञ बनण्याची संधी मिळणार आहे.

ठळक मुद्दे‘इस्रो’मध्ये संशोधनाची संधी राज्यभरातील विद्यार्थ्यांमधून निवडणार ‘यंग सायन्टिस्ट’

अविनाश साबापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : उपजत कुतूहल आणि शोधक वृत्ती असणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना यंदाच्या उन्हाळ्यात चक्क शास्त्रज्ञ बनण्याची संधी मिळणार आहे. हो, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) त्यासाठी विशेष मोहीम आखली आहे. येत्या उन्हाळी सुटीत विद्यार्थ्यांना दोन आठवडे प्रत्यक्ष इस्रोच्या शास्त्रज्ञांसोबत संशोधन कार्य बघता येणार असून स्वत:ही संशोधन करता येणार आहे.देशातील विद्यार्थ्यांमधून तरुण, नव्या दमाचे शास्त्रज्ञ पुढे यावे, या उद्देशाने इस्रोने (इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन) यावर्षीपासून खास शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘यंग सायन्टिस्ट प्रोग्राम’ सुरू केला आहे. याअंतर्गत देशातील निवडक शंभर विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष संशोधन केंद्रात ठेवून प्रशिक्षण दिले जाणार आहे. स्पेस टेक्नॉलॉजी, स्पेस सायन्स आणि स्पेस अप्लीकेशन्स या विषयांची विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष माहिती देणे, त्यातून त्यांच्या मनात अंतराळ संशोधनाची आवड निर्माण करणे असा या मोहिमेचा उद्देश आहे.महाराष्ट्रातून या मोहिमेत विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे म्हणून इस्रोने राज्य शासनाला सूचित केले आहे. त्यानुसार, विद्या प्राधिकरणाने ऑनलाईन लिंक तयार करून इच्छूक विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविले आहे. त्यासाठी माध्यमिक शिक्षणाधिकारी तसेच डायटच्या प्राचार्यांना विशेष निर्देश देण्यात आले आहे. ८ मार्चपासून ही लिंक जाहीर करण्यात आली असून विद्यार्थ्यांना १४ मार्चपर्यंत त्यावर अर्ज दाखल करता येणार आहे.

 कुणाला मिळेल संधीदेशातील प्रत्येक राज्यातून किमान ३ विद्यार्थ्यांची या मोहिमेसाठी निवड होणार आहे. महाराष्ट्रातील राज्य मंडळ, सीबीएसई, आयसीएसईच्या कोणत्याही शाळेतील विद्यार्थी या मोहिमेसाठी अर्ज करू शकतो. मात्र तो विद्यार्थी यावर्षी नवव्या वर्गात शिकत असलेला हवा. विद्यार्थ्यांनी १४ मार्चपर्यंत ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर राज्य शासनातर्फे ही नावे २५ मार्चपर्यंत इस्रोला पाठविली जाईल, असे विद्या प्राधिकरणाचे संचालक डॉ. सुनिल मगर यांनी कळविले. त्यानंतर उन्हाळी सुटीत दोन आठवड्यांचे प्रशिक्षण इस्रो आयोजित करणार आहे. त्यात प्रत्यक्ष विज्ञान प्रात्यक्षिकांसह देशातील नामवंत शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन, अनुभव कथन, इस्रोच्या प्रयोगशाळांची पाहणी, त्यात विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष संशोधन कार्यात भाग घेण्याची संधी असे या प्रशिक्षणाचे स्वरुप राहणार आहे. या विद्यार्थ्यांना इस्रोच्याच गेस्टहाउसमध्ये मुक्कामी ठेवले जाणार असून त्यांचा संपूर्ण खर्च भारतीय अंतराळ संशोधन संस्थाच करणार आहे.ग्रामीण विद्यार्थ्यांना प्राधान्यया मोहिमेसाठी विद्यार्थ्यांची निवड कशी करावी याचे निकष इस्रोने राज्य शासनाला कळविले आहे. संपूर्ण वर्षभरातील विद्यार्थ्याची शैक्षणिक कामगिरी, अवांतर उपक्रमांमधील सहभाग लक्षात घेऊन ही निवड होणार आहे. मात्र यात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विशेष प्राधान्य देण्याचे निर्देशही आहेत.

टॅग्स :scienceविज्ञानStudentविद्यार्थी