‘मॅग्मो’च्या आंदोलनाला वैद्यकीय अधिकाऱ्यांचा विरोध

By Admin | Updated: May 18, 2015 02:11 IST2015-05-18T02:11:23+5:302015-05-18T02:11:23+5:30

आरोग्य विभागातील राजपत्रीत वैद्यकीय अधिकारी संघटना गट अ (मॅग्मो) मधील नेत्यांच्या विरोधात वैद्यकीय अधिकाऱ्यांची भूमिका घेतली आहे.

Opponents of Magmö's medical officers | ‘मॅग्मो’च्या आंदोलनाला वैद्यकीय अधिकाऱ्यांचा विरोध

‘मॅग्मो’च्या आंदोलनाला वैद्यकीय अधिकाऱ्यांचा विरोध

यवतमाळ : आरोग्य विभागातील राजपत्रीत वैद्यकीय अधिकारी संघटना गट अ (मॅग्मो) मधील नेत्यांच्या विरोधात वैद्यकीय अधिकाऱ्यांची भूमिका घेतली आहे. संघटनेने १ जून पासून पुकारलेल्या कामबंद आंदोलनावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घेतला. आरोग्य विभागातील वैद्यकीय संघटनांमध्ये असलेले मतभेद सर्वश्रृत आहेत. आता मात्र उघडपणे एकमेकासमोर उभे ठाकले आहे.
मॅग्मो संघटनेचा सोईस्कररित्या स्वार्थासाठी त्यातील पदाधिकारी वापर करत असल्याचा आरोप वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केला आहे. राज्यशासनाने तालुका आरोग्य अधिकारी या पदावर बीएएमएस अधिकारी नको त्या जागेवर एमबीबीएस वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी असा आदेश दिला. त्यानुसार आरोग्य अधिकाऱ्यांनी कार्यवाही सुरू केल्यानंतर मॅग्मो संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन उभे केले. यापूर्वीचे डीएचओ डॉ. एम.एम. राठोड यांना त्याच कारणावरून जोरदार विरोध करण्यात आल्याचाही आरोप या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केला आहे. हीच मॅग्मो संघटना ४० वैद्यकीय अधिकाऱ्यांचा व्यवसायरोध भत्ता बंद करण्यात आला तेव्हा गप्प होती. याउलट संघटनेच्या अध्यक्षाने वैद्यकीय अधिकाऱ्यांवरच्या कार्यवाहीचे समर्थन केले. आता पुन्हा राज्यस्तरावरील प्रश्न घेऊन मॅग्मो संघटना आंदोलनाच्या तयारीत आहे. या आंदोलनात जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी सहभागी होणार नाही, अशी माहिती डॉ. किशोर कोष्टवार, डॉ. अनिल सदांशिव, डॉ. धर्मेश चव्हाण, डॉ. जब्बार पठाण, डॉ. मुरमुरे, डॉ. संजय दुबे, डॉ. महेश मनवर, डॉ. आशीष पवार, डॉ. चिव्हाणे यांनी दिली आहे. (कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Opponents of Magmö's medical officers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.