विजय दर्डा यांच्या निधीतील आॅटोरिक्षा स्टँडचे लोकार्पण

By Admin | Updated: October 24, 2015 02:29 IST2015-10-24T02:29:36+5:302015-10-24T02:29:36+5:30

लोकमत मीडियाच्या एडीटोरियल बोर्डाचे चेअरमन खासदार विजय दर्डा यांच्या विकास निधीतून उभारण्यात आलेल्या येथील दारव्हा मार्गावरील...

The opening of the autorickshaw stand in Vijay Darda's fund | विजय दर्डा यांच्या निधीतील आॅटोरिक्षा स्टँडचे लोकार्पण

विजय दर्डा यांच्या निधीतील आॅटोरिक्षा स्टँडचे लोकार्पण

यवतमाळ : लोकमत मीडियाच्या एडीटोरियल बोर्डाचे चेअरमन खासदार विजय दर्डा यांच्या विकास निधीतून उभारण्यात आलेल्या येथील दारव्हा मार्गावरील आॅटोरिक्षा स्टँडचे लोकार्पण लोकमत जिल्हा कार्यालय प्रमुख किशोर दर्डा यांच्या हस्ते विजयादशमीच्या पर्वावर गुरूवारी करण्यात आले.
प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर, डॉ. लव किशोर दर्डा, विलास देशपांडे, सुभाष यादव, चंद्रशेखर चौधरी उपस्थित होते. खासदार विजय दर्डा यांच्या विकास निधीतून जवाहरलाल दर्डा चौक, दारव्हा नाका येथे आॅटोरिक्षांसाठी प्रशस्त थांबा तयार करण्यात आला आहे. यामुळे प्रवाशांसोबत आॅटोरिक्षा चालकांचीही गैरसोय टाळली जाणार आहे. कार्यक्रमाला दत्ता हाडके, विक्रांत वानखडे, सिध्दार्थ तेलतुंबडे, भालचंद्र शेळके, विलास गोरलेवार, जीवन शेळके, महेंद्र ढाकरगे, किशोर उमरे, रेवत खाडे, राहुल सवाई, बंडू धवणे, सचिन सवाई, फारूख शेख, अंकुश सवाई, सुनील खंडारे, राजीव भगत, सुभाष मानकर यांच्यासह आॅटोरिक्षा चालक आणि नागरिक उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)

Web Title: The opening of the autorickshaw stand in Vijay Darda's fund

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.