प्रलंबित गुन्ह्यांच्या फाईली उघडणार

By Admin | Updated: September 29, 2014 00:51 IST2014-09-29T00:51:07+5:302014-09-29T00:51:07+5:30

न्यायालयीन कामानिमित्त रविवारी दुपारी अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बिपीन बिहारी यवतमाळात दाखल झाले. यावेळी जिल्ह्यातील ठाणेदार आणि प्रलंबित असलेल्या तपासाच्या

Open Files of Pending Crime | प्रलंबित गुन्ह्यांच्या फाईली उघडणार

प्रलंबित गुन्ह्यांच्या फाईली उघडणार

आयजींचे आदेश : ठाणेदारांसह तपास अधिकाऱ्यांची कानउघाडणी
यवतमाळ : न्यायालयीन कामानिमित्त रविवारी दुपारी अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बिपीन बिहारी यवतमाळात दाखल झाले. यावेळी जिल्ह्यातील ठाणेदार आणि प्रलंबित असलेल्या तपासाच्या अधिकाऱ्यांची त्यांनी येथील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात बैठक घेतली. तसेच तपास प्रलंबित असल्याच्या कारणावरून चांगलीच कानउघाडणी केली.
पुसद शहर, पुसद ग्रामीण, महागाव, उमरखेड, दराटी, बिटरगाव, वडगाव रोड, यवतमाळ शहर, पांढरकवडा यासह विविध पोलीस ठाण्यांतर्गत अनेक गंभीर गुन्हे आणि संपत्तीविषयक गुन्ह्यांचे तपास प्रलंबित आहे. हा आकडा दिवसेंदिवस फुगतच चालला असून जिल्ह्यात पोलिसिंग उरली नसल्याची खंत महानिरीक्षक बिपीन बिहारी यांनी व्यक्त केली. तसेच प्रलंबित तपास तातडीने निकाली काढा अन्यथा कारवाईला सामोरे जा, असा सज्जड दमही भरला. यावेळी प्रथमच ठाणेदारांसोबत तपास अधिकाऱ्यांनाही बैठकीला पाचारण करण्यात आले. त्यांचीही पहिलीच बैठक वादळी ठरली. स्थानिक गुन्हे शाखेसारख्या महत्त्वाच्या शाखेकडेही तपास प्रलंबित असल्याचे पाहून महानिरीक्षक बिहारी चांगलेच संतप्त झाल्याचे सांगण्यात आले. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी बाजू मांडल्याने अनेकजणांचा बचावही झाल्याचे सांगण्यात आले.
(स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Open Files of Pending Crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.