शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरात रस्ते-पुलांसाठी मिळाले केवळ 292 कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 05:00 IST

जिल्ह्यात दळणवळणाची पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे, वेगवान कनेक्टिव्हिटी निर्माण करण्याची प्रमुख जबाबदारी सार्वजनिक बांधकाम खात्यावर आहे. राष्ट्रीय महामार्ग, राज्यमार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग, इतर मार्गांची निर्मिती, त्यावरील लहान-मोठ्या पुलांची निर्मिती, देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी या खात्यावर आहे. परंतु, त्यासाठी पुरेसा निधीच उपलब्ध होत नाही. आधीच हा विभाग निधीसाठी प्रतीक्षेत असतो. दोन वर्षांपासून तर कोरोनामुळे या विभागाला जणू निधीचे ग्रहण लागले आहे.

ठळक मुद्देसार्वजनिक बांधकाम : तब्बल सव्वा दोनशे कोटींची देयके प्रलंबित, निधीअभावी जिल्हाभरातील विकास कामे थांबली

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सार्वजनिक बांधकाम खात्याला जिल्ह्यातील रस्ते व पुलांची निर्मिती, देखभाल-दुरुस्तीसाठी शेकडो कोटींची आवश्यकता असताना प्रत्यक्षात २०२०-२१ या वर्षभरात विविध लेखाशीर्षातून केवळ २९२ कोटी रुपये मिळाले आहेत. कोट्यवधी रुपयांच्या अत्यावश्यक कामांचे प्रस्ताव निधीअभावी प्रलंबित आहे. जिल्ह्यात दळणवळणाची पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे, वेगवान कनेक्टिव्हिटी निर्माण करण्याची प्रमुख जबाबदारी सार्वजनिक बांधकाम खात्यावर आहे. राष्ट्रीय महामार्ग, राज्यमार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग, इतर मार्गांची निर्मिती, त्यावरील लहान-मोठ्या पुलांची निर्मिती, देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी या खात्यावर आहे. परंतु, त्यासाठी पुरेसा निधीच उपलब्ध होत नाही. आधीच हा विभाग निधीसाठी प्रतीक्षेत असतो. दोन वर्षांपासून तर कोरोनामुळे या विभागाला जणू निधीचे ग्रहण लागले आहे. निधीअभावी प्रशासकीय मंजुरी मिळूनही कामे सुरू होऊ शकली नाहीत. काही कामे आहे त्या टप्प्यावर थांबविण्यात आली, तर बहुतांश पूर्णत्वाकडे असलेली कामे संथगतीने केली जात आहे. गेली वर्षभर बांधकाम खात्याला निधीची प्रतीक्षा करावी लागली. किमान मार्च महिन्यात तरी मोठा निधी मिळेल, अशी अपेक्षा या विभागाला होती. परंतु, प्रत्यक्षात तोंडाला पाने पुसली गेली. ३१ मार्चलासुद्धा अपेक्षेनुसार निधी प्राप्त झाला नाही. गेल्या वर्षभरात सहा लेखाशीर्षावरून एकूण २९२ कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. त्यात सर्वाधिक १३५ कोटी रुपये केंद्रीय रस्ते निधीकडून (लेखाशीर्ष ३०५४) मार्ग व पुलांसाठी मिळाले आहे. राज्य मार्गाच्या रस्ते व पुलांसाठी ५५ कोटी, जिल्हा मार्गासाठी ३६ कोटी, योजनेतर मधून ३३ कोटी, तर एशियन डेव्हलपमेंट बँक योजनेतून ३१ कोटी मिळाले आहेत. ग्रामविकासच्या लेखाशीर्ष २५१५ मधून एक रुपयाही वर्षभरात बांधकाम खात्याला मिळालेला नाही. विविध हेडवर अवघा २५ ते ४० टक्के निधी मिळाला. त्यामुळे उर्वरित कामे मार्गी लावायची कशी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. विविध सहा लेखाशीर्षांतर्गत २२५ कोटी रुपयांची देयके प्रलंबित आहेत. ही देयके मिळावी म्हणून जिल्ह्यातील लहान-मोठे कंत्राटदार बांधकाम अभियंत्यांकडे येरझारा घालतात. त्यात आपले देयक आधी निघावे, अधिक रक्कम मिळावी, यासाठी लॉबिंगही केले जाते. परंतु, शासनाने निधीच उपलब्ध करून दिला नाही, तर अभियंते देयक मंजूर करणार कोठून, असा प्रश्न आहे. 

कंत्राटदारांची राज्यस्तरीय एकजूट, आंदोलनाची तयारी सव्वादोनशे कोटींची वर्षभरात देयके थकल्याने कंत्राटदारही आर्थिक अडचणीत आले आहेत. राज्यातील हा आकडा हजार कोटींवर आहे. कित्येकांनी व्याजाने पैसे काढून बांधकाम कंत्राटात गुंतविले. मात्र, आता शासनाकडून निधीच येत नसल्याने या कंत्राटदारांना बँकांच्या व्याजाचा भुर्दंड सहन करावा लागतो. शासनाकडून निधीची हमी नसल्याने कित्येक कामांकडे कंत्राटदारांनी पाठ फिरविली आहे. वर्षोगणती प्रतीक्षा करूनही देयके निधीअभावी मार्गी लागत नसल्याने कंत्राटदारांनी आंदोलनाची तयारी चालविली आहे. त्यासाठी राज्यस्तरावर एकजूट केली जात आहे. 

 पालकमंत्रीच नाही, पाठपुरावा करणार कोण ? जिल्ह्यात सुमारे महिनाभरापासून पालकमंत्रीच नसल्याने शासनस्तरावर निधीसाठी पाठपुरावा करणार कोण, असा प्रश्न आहे. आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये यवतमाळच्या तुलनेत पालकमंत्र्यांनी मार्चअखेरीस विविध योजनांसाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी खेचून नेल्याचे सांगितले जाते. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेत (३) अमरावती जिल्ह्याला राज्यात सर्वाधिक लांबीचे रस्ते व निधी मंजूर केला गेला. यावरून ही बाब सिद्ध होते. 

टॅग्स :highwayमहामार्गpwdसार्वजनिक बांधकाम विभाग