शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

फक्त ५१% जलसाठा! यवतमाळ जिल्ह्यात पाण्याची स्थिती चिंताजनक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 19:12 IST

जिल्ह्यात ७५ सिंचन प्रकल्प : उन्हाळ्यात टंचाईचे चटके बसणार का?

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात मोठे, मध्यम आणि लघु असे ७५ प्रकल्प आहेत. या प्रकल्पांच्या भरोशावरच जिल्हावासीयांची तहान भागते. तसेच शेती सिंचनासाठीही याच प्रकल्पातून पाणी सोडले जाते. यावर्षी अर्धा पावसाळा संपला तरी धरणांतील पाणीसाठ्यात फारसी वाढ झालेली नाही. गतवर्षीच्या तुलनेत यंदा प्रकल्पांतील पाणीसाठ्याची टक्केवारी कमी आहे.

गतवर्षी सरासरीपेक्षा अधिक पर्जन्यमान झाले होते. त्यामुळे सर्वच प्रकल्प ओव्हरफ्लो होऊन नदी-नाले ओसंडून वाहली होती. त्यामुळे यंदा उन्हाळ्यात फारसी पाणीटंचाई जाणवली नाही. अपवाद काही तालुक्यांतील गावांना टँकर्सने पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर आली होती. शिवाय काही विहिरींचे अधिग्रहण करण्यातत आले होते. मात्र, शहरांना पाणीटंचाईचा फटका बसला नाही. जिल्ह्यात पुस, बेंबळा आणि अरुणावती असे तीन मोठे प्रकल्प आहेत. यावर्षी अर्धा पावसाळा संपला तरी या सिंचन प्रकल्पांतील जलसाठ्यात समाधानकारक वाढ झाली नसल्याचे दितस आहे. अरुणावती प्रकल्पात तर अवघे २९ टक्केच पाणी आहे. लघु प्रकल्पांतील पाणीसाठ्याची स्थितीही विशेष नाही. केवळ मध्यम प्रकल्पांमध्ये बऱ्यापैकी जलसाठा आहे. एकूण प्रकल्पांत ५१.३२ टक्केच पाणी असल्याने चिंता कायम आहे. त्यामुळे दमदार पावसाची आवश्यकता आहे. 

प्रकल्पांमध्ये आहे जेमतेमच जलसाठामोठ्या पूस प्रकल्पात ५६.२८ टक्के जलसाठा असून, बेंबळात ३७.४० तर अरुणावतीत केवळ २९.२६ टक्केच पाणी आहे. मध्यम सातपैकी दोन १०० टक्के भरले असून, इतर पाच प्रकल्पात बऱ्यापैकी साठा आहे. लघू ६५ प्रकल्पांत केवळ ५२.६० टक्के पाणी आहे. गतवर्षी लघू प्रकल्पांत ६२.९९ टक्के जलसाठा होता. 

पाच प्रकल्पातून पाण्याचा विसर्गमध्यम वाघाडी १३ सेमी तर सायखेडा प्रकल्पातून १२ सेमीने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. अडाण प्रकल्पाचे दोन दरवाजे १० सेमीने उघडून नदी पात्रात पाण्याचा विसर्ग केला जात आहे. लघू प्रकल्प असलेल्या टाकळीतून १.५० आणि मुंजाळा प्रकल्पातून २ सेमीने पाणी विसर्ग सुरू आहे. 

२०२४ च्या तुलनेत मोठा बॅकलॉगजिल्ह्यात मोठे, मध्यम आणि लघू असे एकूण ७५ प्रकल्प आहे. गतवर्षी या सर्व प्रकल्पांमध्ये याच कालावधीपर्यंत ६५.१८ टक्के जलसाठा होता. यंदा मात्र कमी पर्जन्यमानामुळे प्रकल्पांमध्ये केवळ ५१.३२ टक्केची पाणी आहे. त्यामुळे सुमारे १४ टक्के पाण्याचा बॅकलॉग आहे. धरणे तुडुंब भरण्यासाठी दमदार पावसाची गरज आहे. 

मोठ्या, मध्यम प्रकल्पांतील पाण्याची आकडेवारीप्रकल्प                    दलघमी           टक्केपूस                            ५१.३६            ५६.२८अरुणावती                  ४९.६५            २९.२६बेंबळा                        ६८.८०            ३७.४०गोकी                          २४.०८            ५६.३८वाघाडी                       ३५.३६             १००सायखेडा                     २७.१८             १००लोअरपूस                    ३८.००            ६३.७३बोरगाव                       ५.७७             ८७.२९अडाण                        ४२.३९            ६३.०३नवरगाव                      ११.५८            ९२.७९

किती प्रकल्प ओव्हरफ्लो ?जिल्ह्यात सात मध्यम प्रकल्पांपैकी केवळ वाघाडी आणि सायखेडा हे दोनच प्रकल्प ओव्हरफ्लो झाली आहे. या प्रकल्पांत १०० टक्के पाणीसाठा असून, इतर पाच प्रकल्पांमध्ये २० टक्क्यांच्या आतच पाणी आहे. 

टॅग्स :Yavatmalयवतमाळ