दारव्हात केवळ ३८ टक्केच पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2019 10:32 PM2019-08-09T22:32:03+5:302019-08-09T22:32:30+5:30

तालुक्यात पावसाची वार्षिक सरासरी ८०५ मिलीमीटर आहे. मात्र यावर्षी आॅगस्ट महिना निम्मा संपत आला असताना केवळ ३०७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. हा आकडा वार्षिक सरासरीच्या केवळ ३८ टक्केच आहे. त्यामुळे दारव्हा तालुक्याला दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.

Only 5 percent of the rainfall in Darwat | दारव्हात केवळ ३८ टक्केच पाऊस

दारव्हात केवळ ३८ टक्केच पाऊस

Next
ठळक मुद्देसर्वच प्रकल्प कोरडे : नदी, नाल्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा, अडाण नदी कोरडीच, मात्र पिकांना मिळाली संजीवनी

मुकेश इंगोले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
दारव्हा : तालुक्यात पावसाची वार्षिक सरासरी ८०५ मिलीमीटर आहे. मात्र यावर्षी आॅगस्ट महिना निम्मा संपत आला असताना केवळ ३०७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. हा आकडा वार्षिक सरासरीच्या केवळ ३८ टक्केच आहे. त्यामुळे दारव्हा तालुक्याला दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.
यावर्षी तालुक्यात पावसाच्या जोरदार सरी बरसल्या नाही. आत्तापर्यंत झडही अनुभवता आली नाही. त्यामुळे पाणीपातळीत वाढ होऊ शकली नाही. लहान-मोठ्या प्रकल्पात जलसाठा गोळा झाला नाही. अडाणसह इतर नद्या, नाले कोरडे पडले आहे. येत्या काळात अपेक्षित पाऊस पडला नाही, तर पिके, पिण्याचे पाणी व सिंचनाचा बिकट प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.
तालुक्यात यावर्षी पावसाची सुरुवातच उशिराने झाली. मृग नक्षत्रात पावसाचा थेंबही पडला नाही. २२ जूनपर्यंत पाऊस न आल्यामुळे खरिपातील पेरण्या खोळंबल्या होत्या. जूनच्या शेवटच्या आठवड्यात थोडाफार पाऊस पडला. त्यानंतर शेतकऱ्यांनी लागवड केली. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बºयापैकी पाऊस पडला. मात्र १५ जुलैनंतर पावसाने पुन्हा दडी मारली. उन्हाळ्यासारखी कडक उन्हा तापली. त्यामुळे पिके करपली. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले. नंतर पाऊस परतला. मात्र अद्याप दमदार झालाच नाही. तथापि पिकांना योग्य असा पाऊस झाल्याने कापूस, सोयाबीन, तूर या प्रमुख पिकांसह इतर पिकांची स्थिती सुधारल्याचे चित्र आहे.
आत्तापर्यंतची आकडेवारी बघता यावर्षी परिस्थिती चिंताजनक दिसत आहे. आॅगस्ट महिन्याचा पहिला आठवडा ओलांडला तरी तालुक्यात आत्तापर्यंत केवळ ३०७.७० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. हा आकडा वार्षिक सरासरीच्या केवळ ३३ टक्केच आहे. मागील वर्षी एकूण ५४० मिमी पाऊस पडला होता. त्यामुळे यावर्षी पावसाळ्याचे शिल्लक दिवस बघता हा आकडा गाठणे कठीण दिसते. कमी पावसामुळे जमिनीतील पाण्याची पातळी वाढली नाही. तालुक्यातील लहान-मोठे प्रकल्प नद्या, नाल्यांमध्ये जलसाठा होऊ शकला नाही. त्यामुळे येत्या काळात चांगला पाऊस न झाल्यास तालुक्यावर पाणीसंकट ओढवले जाण्याची भीती आहे. उर्वरित काळात दमदार पाऊस व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
अडाण प्रकल्पात साडेपाच टक्के पाणी
तालुक्यातील सर्वात मोठा प्रकल्प असलेल्या म्हसणी येथील अडाण प्रकल्पात केवळ साडेपाच टक्के जलसाठा आहे. मागीलवर्षी जुनमध्येच हे धरण ६० टक्के भरले होते. त्यावेळी धरणातील पाणी सोडल्याने अडाण नदीला पूर आला होता. ७८.३२ दलघमी पाणी साठवण क्षमता असलेल्या या प्रकल्पावर दारव्हा शहरासह अनेक गावांच्या पाणीपुरवठा योजना, २० गावांतील १९ हजार ७६ एकर क्षेत्रावरील सिंचन अवलंबून आहे. पावसाळ्यात अडाण नदी कोरडी आहे. कुंभारकिन्ही प्रकल्पात ५० टक्के, तर महागाव (कसबा) लघु प्रकल्पात केवळ पाच टक्के जलसाठा आहे. यावर्षी गोखी, अंतरगाव यासह कोणत्याही प्रकल्पाने अद्याप पाणी पातळी गाठली नाही.

Web Title: Only 5 percent of the rainfall in Darwat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस