शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

ऑनलाईन नामांकनाकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 6:00 AM

रवींद्र चांदेकर । लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : आधुनिक युगात सर्वच बाबी ऑनलाईन झाल्या आहे. नागरिक घरबसल्या मोठमोठ्या वस्तूंची ...

ठळक मुद्देप्रशासन हतबल : सुविधेचा लाभच नाही, प्रत्यक्ष नामांकनावर भर

रवींद्र चांदेकर ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : आधुनिक युगात सर्वच बाबी ऑनलाईन झाल्या आहे. नागरिक घरबसल्या मोठमोठ्या वस्तूंची खरेदी करीत आहे. प्रशासनातही ऑनलाईनला भलतेच महत्व प्राप्त झाले. मात्र निवडणूक आयोगाने ऑनलाईन नामांकन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतरही उमेदवारांनी त्याकडे पाठ फिरविल्याची प्रचिती येत आहे.निवडणूक आयोगाने हायटेक पद्धतीचा अवलंब केला आहे. त्यानुसार उमेदवारांना घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने उमेदवारी अर्ज दाखल करता येतो. यापूर्वीच्या लोकसभा आणि त्यापूर्वीच्या अनेक निवडणुकीत ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. त्याला चांगला प्रतिसाद लाभेल, अशी प्रशासनाची अपेक्षा होती. मात्र ही अपेक्षा फोल ठरल्याची प्रचिती येत आहे. आतापर्यंतच्या अनेक निवडणुकीमध्ये ऑनलाईन नामांकनाला ब्रेक लागल्याचे दिसून येत आहे. प्रत्यक्षात नामांकन अर्ज दाखल करण्यावरच सर्व उमेदवारांचा जोर दिसत आहे. त्यामुळे ही अत्याधुनिक सुविधा कुचकामी ठरल्याचे बोलले जात आहे.पूर्वीपासून सर्वच पक्षीय व अपक्ष उमेदवारांमध्ये वाजत-गाजत जाऊन अर्ज भरण्याची परंपरा आहे. यातून पक्ष आणि उमेदवार आपले शक्ती प्रदर्शन करतात. अर्ज भरताना सोबत किती कार्यकर्ते आहे यावरून त्यांचे निवडणुकीचे गणित लावले जाते. त्यासाठी उमेदवार मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची जमवाजमव करून मिरवणुकीने अर्ज भरण्यासाठी जातात. तोच पायंडा अद्यापही कायम आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने सुविधा उपलब्ध करून देऊनही उमेदवार त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे हल्ली निवडणुकीत अनेक उच्च शिक्षितही उमेदवार म्हणून उभे ठाकतात. मात्र अशा उमेदवारांनीही ऑनलाईन नामांकनाकडे दुुर्लक्ष केल्याचे स्पष्ट होत आहे.सध्या विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास अद्याप सुरूवात झाली नाही. २७ सप्टेंबरपासून अर्ज भरण्यास सुरूवात होणार आहे. मात्र यावेळीही उमेदवार वाजतगाजत जाऊन नामांकन दाखल करण्याची शक्यता आहे.वाजतगाजत जाण्याकडेच सर्व उमेदवारांचा कलऑनलाईन अर्ज दाखल केल्यानंतर त्याची हार्डकॉपी (प्रिंटआऊट) संबंधित निवडणूक अधिकाऱ्याकडे सादर करावी लागते. त्यावेळी संबंधित उमेदवाराला शपथ घ्यावी लागते. याप्रक्रियेता उमेदवाराचा वेळ वाचतो. प्रशासनालाही सुविधा होते. मात्र उमेदवार प्रत्यक्ष अर्ज भरत असल्याने ऑनलाईन नामांकन कुचकामी ठरल्याचे दिसत आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019