ट्रकची दुचाकीला धडक एक ठार, एक गंभीर
By Admin | Updated: June 26, 2017 00:47 IST2017-06-26T00:47:53+5:302017-06-26T00:47:53+5:30
भरधाव ट्रकने दुचाकीला चिरडल्याने झालेल्या भीषण अपघातात एक तरुण जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी झाला.

ट्रकची दुचाकीला धडक एक ठार, एक गंभीर
लोकमत न्यूज नेटवर्क
जवळा : भरधाव ट्रकने दुचाकीला चिरडल्याने झालेल्या भीषण अपघातात एक तरुण जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी झाला. हा अपघात यवतमाळ-आर्णी मार्गावरील शेलू फाट्यावर रविवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास घडला.
प्रमोद बाबाराव जाधव (२२) रा. हडसनी ता. माहूर असे मृताचे नाव आहे. तर अक्षय गणेश इंगोले (२५) असे गंभीर जखमीचे नाव आहे. प्रमोद आणि अक्षय दुचाकी क्र. एम.एच.२९-एएल-९७२८ ने यवतमाळ येथे लग्नासाठी जात होते. शेलू फाट्याजवळ समोरुन येणाऱ्या ट्रकने दुचाकीला धडक दिल. धडक एवढी जबर होती की, दुचाकीस्वार ट्रकच्या समोरील चाकात अडकून ५० फुटापर्यंत फरफटत गेला. त्यात प्रमोदचा जागीच मृत्यू झाला. तर अक्षय गंभीर जखमी झाला. जखमीला यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. घटनास्थळावरील दृष्य पाहून प्रत्येकजण हळहळत होते.
विशेष म्हणजे मृतक प्रमोदची बहीण शेलू येथेच राहते. या अपघाताची माहिती शेलू येथे होताच संपूर्ण गाव घटनास्थळी धावून आले होते. या अपघाताने काही काळ नागपूर-बोरी-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.