शहरं
Join us  
Trending Stories
1
Ambernath Accident: अंबरनाथमध्ये निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिंदेसेनेच्या उमेदवाराच्या कारला अपघात, ४ ठार!
2
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
3
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
4
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
5
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
6
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
7
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
8
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
9
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
10
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
11
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
12
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
13
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
14
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
15
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
16
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
17
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
18
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
19
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
20
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
Daily Top 2Weekly Top 5

वन-पोलीस कर्मचाऱ्यांचे सर्च आॅपरेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 22:32 IST

खंडाळा वनपरिक्षेत्रातील जनुना परिसरात वन विभागाच्या कर्मचाऱ्यावर सागवान तस्करांनी प्राणघातक हल्ला केला. या घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी वन विभाग व पोलिसांनी संयुक्तपणे सर्च आॅपरेशन मोहीम राबविली.

ठळक मुद्देवनपालास मारहाण : खंडाळा, अमृतनगर, मारवाडी वनक्षेत्रात संयुक्तपणे पहिलीच मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : खंडाळा वनपरिक्षेत्रातील जनुना परिसरात वन विभागाच्या कर्मचाऱ्यावर सागवान तस्करांनी प्राणघातक हल्ला केला. या घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी वन विभाग व पोलिसांनी संयुक्तपणे सर्च आॅपरेशन मोहीम राबविली.जनुना परिसरातील जंगलात सागवान तस्कर लाकूडतोड करीत होते. या तस्करांना वनपाल जयंत राठोड यांनी लाकडे तोडण्यास मनाई केली. खंडाळा बीटमध्ये ही घटना घडली. राठोड यांच्या मनाईने संतापलेल्या सागवान तस्करांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात वनपाल जखमी झाले. त्यानंतर त्यांनी पुसद ग्रामीण पोलिसात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून जवळपास १३ जणांविरुद्ध पोलिसांनी विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला.या घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी वन विभाग व पोलिसांनी संयुक्तपणे सर्च आॅपरेशन मोहीम राबविली. यातून आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली. मंगळवारी तालुक्यातील खंडाळा व वसंतनगर पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी व पुसद वन विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे खंडाळा, अमृतनगर, मारवाडी वन क्षेत्रात सर्च आॅपरेशन केले. या सर्च आॅपरेशनमध्ये पुसद, काळी दौ, महागाव, शेंबाळपिंपरी व दिग्रस वनपरिक्षेत्रातील सर्व वन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. त्यांनी प्राणघातक हल्ल्यातील आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी केली. या सर्च आॅपरेशनमध्ये उपवनसंरक्षक अरविंद मुंढे, उपविभागीय पोलीस अधिकारी आयपीएस अजयकुमार बन्सल, एसीएफ बी.एन. पायघन, बापू कऱ्हे, रत्नपारखी, आरएफओ आनंद धोत्रे, हेमंत उबाळे, एस.एस. जोग, सचिन सावंत, संदीप गिरी, विठ्ठल मळघने, सुभाष पवार, वनपाल शालिक जाधव, संघई, शेरे, सुरेश राठोड, पी.के.जाधव, जयंत राठोड, आर.आर. राठोड, गंगाखेडे, खान, मस्के, अर्जून राठोड आणि वसंतनगरचे ठाणेदार चौबे, खंडाळाचे ठाणेदार ठाकूर यांच्यासह पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते.

टॅग्स :forest departmentवनविभागPoliceपोलिस