नांदगव्हाण घाटात एकाचा घात...
By Admin | Updated: February 12, 2017 00:18 IST2017-02-12T00:18:10+5:302017-02-12T00:18:10+5:30
महागाव तालुक्यातील नांदगव्हाण घाटात अपघातांची गेल्या काही दिवसांपासून मालिकाच सुरू आहे.

नांदगव्हाण घाटात एकाचा घात...
नांदगव्हाण घाटात एकाचा घात... महागाव तालुक्यातील नांदगव्हाण घाटात अपघातांची गेल्या काही दिवसांपासून मालिकाच सुरू आहे. त्यातच शनिवारी पहाटे पुन्हा एका ट्रकचा भीषण अपघात झाला. ट्रकच्या केबिनमध्येच दबून चालकाचा जागीच मृत्यू झाला. नागनाथ बेचके (४०) असे मृताचे नाव असून तो बेडी येथील रहिवासी होता. हा ट्रक नांदेडकडून नागपूरकडे निघाला होता.