शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
4
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
5
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
6
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
7
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
8
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
9
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
10
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
11
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
12
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
13
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
14
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
15
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
16
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
17
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
18
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
19
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
20
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...

एक प्यार का नगमा हैं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 12:14 AM

मी माहेरच्या माणसांपुढे गात आहे.. अशी कृतज्ञता व्यक्त करीत ख्यातनाम पार्श्वगायिका वैशाली माडे यांच्या मृदू गळ्याची जादू अवघ्या मातोश्री उद्यानावर विखुरली होती.

ठळक मुद्देज्योत्स्ना दर्डा स्मृती : रमाकांत गायकवाड व वैशाली माडेंची स्वरांजली

अविनाश साबापुरे।ऑनलाईन लोकमतयवतमाळ : एक प्यार नगमा हैंमौजों की रवानी हैंजिंदगी और कुछ भी नहीतेरी मेरी कहानी हैं...मी माहेरच्या माणसांपुढे गात आहे.. अशी कृतज्ञता व्यक्त करीत ख्यातनाम पार्श्वगायिका वैशाली माडे यांच्या मृदू गळ्याची जादू अवघ्या मातोश्री उद्यानावर विखुरली होती. तत्पूर्वी ख्यातकीर्त शास्त्रीय गायक रमाकांत गायकवाड यांनी उद्यानाच्या रम्य वातावरणावर रागदारीचा दरवळ शिंपडला होता. प्रसंग होता ‘लोकमत सखी मंच’च्या संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतीदिनाचा अन् अवघे यवतमाळकर जमले होते स्वरांजली अर्पण करण्यासाठी!गुरूवारी सायंकाळी येथील ‘प्रेरणास्थळा’वर ही घरंदाज स्वरमैफल बहरली होती. लोकमत सखी मंचच्या संस्थापक अध्यक्ष तथा संगीताच्या निस्सीम साधक ज्योत्स्ना दर्डा यांना पाचव्या स्मृतिदिनी दोन कसलेल्या गायकांनी ‘स्वरांजली’ अर्पण केली.रमाकांत गायकवाड या तरुण शास्त्रीय गायकाच्या परिपक्व स्वरांनी मैफलीचा पाया रचला. हातातल्या स्वरमंडलावर हळूवार बोटे फिरवित तेवढ्याच मुलायम स्वरांची रिमझीम बरसात सुरू झाली. यमन रागाने सुरूवात करीत गायकवाड यांनी रसिकांच्या काळजाला हात घातला. ‘याद पिया की आये.. ये दुख सहा न जाये’ ही रचना आळविताना ते यवतमाळकर रसिकांना वेगळ्याच दुनियेत घेऊन गेले.कागा सब तन खायोऔर चुन चुन खायो मासये दो नैन ना खायोइन्हे पिया मिलन की आसअशी रुबाई गाऊन रमाकांत गायकवाड यांनी शास्त्रीय संगीताची रूबाबदार पेशकश केली. शास्त्रीय राग गाताना त्यांनी हलकेच अभंग रचनेकडे मोर्चा वळविला. ‘देवाचिये द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्ती चारी साधियेल्या’ हा अभंग अस्सल शास्त्रीयपद्धतीने सादर झाला तेव्हा रसिकांनी टाळ्यांची बरसात केली. रमाकांत गायकवाड यांना तबल्यावर रामकृष्ण करंबेळकर तर संवादिनीवर अभिनय लवंडे यांनी सुंदर साथ दिली. शास्त्रीय रचनांनी रसिकांची बैठक जमविलेली असतानाच वैशाली माडे यांच्या तरल स्वरांनी रसिकांना हिंदी-मराठी सिने-भावगीतांच्या लहरींवर तरंगत नेले. रमाकांत गायकवाड यांनी रागदारीचा धागा दिला तर वैशाली माडेंनी त्याला मनोरंजनाचा पतंग बांधून तो रसिकांच्या हाती दिला अन् रसिकांनी तो आनंदाच्या कळसावर नेला.रंजीशही सहीदिल ही दुखाने की लिये आआ मुझे फिर सेछोड के जाने के लिये आया ओळींतून वैशालीने सुरूवातीलाच ज्योत्स्ना दिदींना आदरांजली अर्पण केली. ‘वो जब याद आये बहुत याद आये’ अशा जुन्या रसिल्या गीतांतून रसिकांना नवा ताजेपणा दिला. स्मृतिदिनाच्या या कार्यक्रमात जीवनाचा खरा अर्थ सांगण्यासाठी खास रचना वैशालीने खुबीने पेश केली...जिंदगी और कुछ भी नही तेरी मेरी कहानी हैं’ हे गाणे येताच रसिक वैशालीसोबत गाऊ लागले. खास फर्माईशीवरून ‘दमादम मस्तकलंदर’ गातानाच वैशालीने यमन रागातील विविध सिनेगीतांचा नजराणाही सादर केला. नाम गुम जायेगा, लंबी जुदाई, बहोमे चले आओ अशा गीतांना विशेष दाद मिळाली. मेंदीच्या पानावर, शुक्रतारा मंद वारा ही मराठी भावगीते वैशालीने वैदर्भी ‘टच’ देऊन सादर केली. तर हात नका लावू माझ्या साडीला ही लावणी गाताना खास मराठमोळा ठसका दिसला. ज्याची वारंवार फर्माईश आली ते ‘पिंगा गं पोरी पिंगा’ गाणे रसिकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले.या उधाणत्या मैफलीत वैशालीला शिवा सरोदे या उमद्या गायकानेही साथ दिली. संगीत संयोजन पंकज सिंग यांचे होते. तर सुधीर अवनील, मनोज विश्वकर्मा, विशाल रामनगरिया, नीलेश सावरकर या वाद्यवृंदांनी गाण्यांना रंग चढविला.या सुरेल मैफलीचे सूत्रसंचालन अ‍ॅड. प्रवीण जानी यांनी केले. तर लोकमत जिल्हा कार्यालयप्रमुख किशोर दर्डा यांनी कलावंतांसह उपस्थित सर्व यवतमाळकर रसिकांचे आभार मानले.कलावंत, मान्यवरांचा सत्कारपार्श्वगायिका वैशाली माडे, शास्त्रीय गायक रमाकांत गायकवाड, लोकमत मीडिया प्रा.लि.च्या एडिटोरिअल बोर्डचे चेअरमन विजय दर्डा, न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध हिरे व्यावसायिक पन्नालाल जैन, रजनीदेवी जैन, सुनीत कोठारी, पूर्वा कोठारी, मीनाक्षी जैन, लोकमत जिल्हा कार्यालयप्रमुख किशोर दर्डा, लोकमत सखी मंच प्रमुख सीमा दर्डा यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा श्रीगणेशा करण्यात आला. यावेळी पन्नालाल जैन आणि रजनीदेवी जैन यांचा किशोर दर्डा यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. तसेच गायक कलावंत आणि वाद्यवृंदांचाही शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.