शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

एक लाख शेतकरी कर्ज प्रक्रियेच्या बाहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2024 18:39 IST

Yavatmal : जिल्हास्तरीय बँकर्स समितीचा आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : खरिपातील पेरण्या संपण्याच्या वाटेवर आहेत. मात्र, यानंतरही निम्म्या अधिक शेतकऱ्यांना पीककर्ज मिळाले नाही. अजूनही एक लाख शेतकरी कर्ज प्रक्रियेच्या बाहेर आहेत. यामुळे बँकांनी पीककर्ज वाटपाचे प्रमाण वाढवावे. पीककर्जासह शिक्षण, गृह तसेच विविध योजनांसाठीदेखील कर्जवाटपाचे बँकांना उद्दिष्ट देण्यात आले आहे. बँकांनी या उद्दिष्टाप्रमाणे काम करत अधिकाधिक कर्ज वाटप करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी मंगळवारी बँकर्स कमिटीच्या बैठकीत दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवनामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैंकर्स समितीची बैठक घेण्यात आली. त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या. बैठकीला भारतीय रिझर्व्ह बँकेचे मॅनेजर सर्वज्ञ सिंग, जिल्हा अग्रणी बँक प्रबंधक अमर गजभिये, नाबार्डचे जिल्हा विकास अधिकारी दीपक पेंदाम, बँक ऑफ इंडियाचे रिजनल मॅनेजर कौस्तुभ चक्रवर्ती, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक वैशाली रसाळ, आत्माचे प्रकल्प संचालक संतोष डाबरे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त विजय रहाटे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी क्रांती काटोले आदी उपस्थित होते.

गैरप्राधान्य क्षेत्रासाठी ५१ हजार ६०० खातेधारकांना एक हजार ५०० कोटींच्या कर्ज वाटपाचा समावेश आहे. बँकांना वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्याप्रमाणे कर्जवाटपाच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या.

एक हजार २३५ कोटींचे कर्ज वितरणजिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी बँकनिहाय कर्ज वाटपाचा आढावा घेतला. जिल्ह्याला २ हजार २२० कोटी रुपयांच्या पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट होते. आतापर्यंत १ लाख १६ हजार शेतकऱ्यांना १ हजार २३५ कोटी रुपयांच्या कर्जाचे वाटप झाले. ज्या बँकांनी चांगले कर्जवाटप केले. त्यांचे जिल्हाधि- काऱ्यांनी कौतुक केले.

इतर उद्दिष्टावर विचारला जाबबँकांना कृषी क्षेत्रासह इतर क्षेत्रा- साठीदेखील कर्जवाटपाचे उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. याशिवाय शेतीउ- पयोगी कामांसाठी कर्ज, उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज, गृहकर्ज, उद्योग, व्यवसाय, रोजगार, उभारणीकरिता कर्ज दिले जाते. याचाही बँकनिहाय आढावा घेतला.

सात हजार २५ कोटींचा ऋण आराखडा■ जिल्हा अग्रणी बँकेने सन २०२४, २०२५ या आर्थिक वर्षाकरिता जिल्ह्यासाठी जिल्हा ऋण योजना तयार केली. या योजनेच्या आराखड्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते यावेळी प्रकाशन करण्यात आले. यावर्षीचा ऋण आराखडा ७ हजार २५ कोटींचा आहे. त्यात प्राधान्य क्षेत्रात ३ लाख ८९ हजार ७५ खातेदारांना ५ हजार ५२५ कोटींचे वाटप प्रस्तावित आहे. 

टॅग्स :farmingशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रYavatmalयवतमाळ