लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : लातूर येथून अंगुर घेऊन नागपूरकडे जाणाऱ्या ट्रकला पांढरकवडा चौफुलीवर भरधाव ट्रॅव्हल्सने धडक दिली. यात ट्रकचे मोठे नुकसान होऊन चालकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी पहाटे ४.३० वाजता दरम्यान घडली.रफीक जब्बार शेख (४५) रा.बुराननगर लातूर असे मृत ट्रकचालकाचे नाव आहे. तो लातूर येथून अंगूर घेऊन ट्रकने (एम.एच.४३/एडी-२९०३) नागपूर येथे जात होता. महामार्गावर यवतमाळ शहरालगत पांढरकवडा चौफुलीवर डीएनआर ट्रॅव्हल्स (एम.एच.३४/बीएच-८४७७) ही भरधाव वेगाने कुठलेही इंडिकेटर न देता टर्न झाली. यात ट्रकवर जाऊन आदळली. ट्रॅव्हल्सच्या धडकेने ट्रकचे केबीन चकनाचूर झाले. सुदैवाने वाहक नामदेव सोपान पवार (रा.आरी, जि.लातूर) याला कोणती दुखापत झाली नाही. त्याने जखमी चालक रफीक जब्बार शेख याला बाहेर काढून नागरिकांच्या मदतीने शासकीय रुग्णालयात हलविले. मात्र तेथे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नामदेव पवार याच्या तक्रारीवरून ट्रॅव्हल्स चालक विजय त्रिवेदी याच्याविरूद्ध शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
ट्रॅव्हल्स-ट्रक अपघातात एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 06:00 IST
रफीक जब्बार शेख (४५) रा.बुराननगर लातूर असे मृत ट्रकचालकाचे नाव आहे. तो लातूर येथून अंगूर घेऊन ट्रकने (एम.एच.४३/एडी-२९०३) नागपूर येथे जात होता. महामार्गावर यवतमाळ शहरालगत पांढरकवडा चौफुलीवर डीएनआर ट्रॅव्हल्स (एम.एच.३४/बीएच-८४७७) ही भरधाव वेगाने कुठलेही इंडिकेटर न देता टर्न झाली. यात ट्रकवर जाऊन आदळली.
ट्रॅव्हल्स-ट्रक अपघातात एक ठार
ठळक मुद्देपांढरकवडा चौफुलीवर धडक : मृत चालक लातूर जिल्ह्यातील