पांढरकवडा पालिकेला एक कोटीचा पुरस्कार
By Admin | Updated: May 6, 2017 00:17 IST2017-05-06T00:17:37+5:302017-05-06T00:17:37+5:30
नगरविकासाच्या कामात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पांढरकवडा नगरपरिषदेने अमरावती विभागातून व्दितीय क्रमांक प्राप्त केला आहे.

पांढरकवडा पालिकेला एक कोटीचा पुरस्कार
अमरावती विभागातून द्वितीय : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुंबईत दिला पुरस्कार
तालुका प्रतिनिधी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पांढरकवडा : नगरविकासाच्या कामात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पांढरकवडा नगरपरिषदेने अमरावती विभागातून व्दितीय क्रमांक प्राप्त केला आहे. एक कोटी रूपयांचा हा पुरस्कार व प्रशस्तीपत्र गुरूवारी मुंबई येथील यशवंतराव प्रतिष्ठाण येथे झालेल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नगराध्यक्षा वंदना रॉय व मुख्याधिकारी अशोक गराटे यांनी स्विकारला.
यावेळी नगर विकास राज्यमंत्री रणजीत पाटील, आमदार राजू तोडसाम, प्रधान सचिव मनिषा म्हैसकर, आयुक्त विरेंद्र सिंग, सचिव मिलिंद म्हैसकर उपस्थित होते. नगराध्यक्षा वंदना रॉय व मुख्याधिकारी अशोक गराटे यांचा देखील यावेळी स्वतंत्र प्रशस्तीपत्र देऊन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
स्वच्छता अभियानाचे माध्यमातून पांढरकवडा नगरपरिषदेने शहर स्वच्छ व सुंदर करण्याचा प्रयत्न केला. तसेच उत्पन्न वाढविणे आणि अंतर्गत व्यवस्थापनातही चांगले काम केले. या कार्याची दखल घेत अमरावती विभागाचा व्दितीय क्रमांकाचा एक कोटी रूपयांचा पुरस्कार पांढरकवडा नगरपरिषदेला घोषित करण्यात आला होता.
महाराष्ट्र शासनाचा हा पुरस्कार मिळण्यासाठी नगरपरिषदेचे सर्व कर्मचारी, पदाधिकारी यांचा सिंहाचा वाटा असून नागरिकांच्या सहकाऱ्यामुळेच हे शक्य होऊ शकले, अशी प्रतिक्रिया नगराध्यक्षा वंदना रॉय यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.