ट्रकच्या धडकेत एक गाय ठार, सहा जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:48 IST2021-08-20T04:48:45+5:302021-08-20T04:48:45+5:30
तालुक्यातील कोसदनी घाटात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे नेहमी अपघात होतात. बुधवारी गायी जंगलात चरण्यासाठी जात असताना समोरून भरधाव ...

ट्रकच्या धडकेत एक गाय ठार, सहा जखमी
तालुक्यातील कोसदनी घाटात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे नेहमी अपघात होतात. बुधवारी गायी जंगलात चरण्यासाठी जात असताना समोरून भरधाव वेगाने ट्रक (एम.एच. ३४/ बी.जी. २३१७) नागपूरवरून नांदेडकडे सिमेंट घेऊन जात होता. ट्रकचालकाचे नियंत्रण सुटले आणि समोरून येणाऱ्या गायींच्या कळपात ट्रक घुसला. त्यामुळे अपघात झाला.
यात कोसदनी येथील शेतकरी संजय नथू राठोड यांच्या मालकीची एक गाय ठार झाली. त्यांचे २५ हजारांचे नुकसान झाले. तसेच शंकर राठोड यांची एक गाय, एक गोऱ्हा, विनोद ठाकरे, शिवाजी लांडगे, रमेश पवार, संदीप जाधव यांच्या मालकीची प्रत्येकी एक गाय जखमी झाली. जखमी गायींच्या उपचारासाठी नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी गोपालकांनी केली आहे. पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला आहे.
190821\1446-img-20210819-wa0155.jpg
हाच तो अपघात करणारा ट्रक