पुसदमध्ये साडेसात कोटींची वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 05:00 IST2020-02-10T05:00:00+5:302020-02-10T05:00:16+5:30

न्यायालयातील खटल्यांची वाढती संख्या लक्षात घेता तातडीने न्याय मिळणे कठीण झाले आहे. अशा स्थितीत खटल्यांचा त्वरित निपटारा करण्याच्या दृष्टीने लोक न्यायालयाला वाढता प्रतिसाद मिळत आहे. येथील न्यायमंदिरात रविवारी झालेल्या लोक न्यायालयात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. एकूण एक हजार ८१९ प्रकरणे लोकन्यायालयात ठेवण्यात आली.

One and a half crore recovered in Pusad | पुसदमध्ये साडेसात कोटींची वसुली

पुसदमध्ये साडेसात कोटींची वसुली

ठळक मुद्देराष्ट्रीय लोकन्यायालय : २३३ प्रकरणांचा निपटारा, पक्षकारांना मिळाला दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : तालुका विधी सेवा समितीतर्फे येथील न्यायमंदिरात रविवारी तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश-१ एस.बी. गावंडे यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रीय लोकन्यायालय घेण्यात आली. या लोकन्यायालयात विविध २३३ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. यातून तब्बल सात कोटी ५५ लाख ३२ हजार ८८० रुपयांचे तडजोड शुल्क जमा करण्यात आले.
न्यायालयातील खटल्यांची वाढती संख्या लक्षात घेता तातडीने न्याय मिळणे कठीण झाले आहे. अशा स्थितीत खटल्यांचा त्वरित निपटारा करण्याच्या दृष्टीने लोक न्यायालयाला वाढता प्रतिसाद मिळत आहे. येथील न्यायमंदिरात रविवारी झालेल्या लोक न्यायालयात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. एकूण एक हजार ८१९ प्रकरणे लोकन्यायालयात ठेवण्यात आली. यात मोटर व्हेईकल अ‍ॅक्टची सर्वाधिक एक हजार ४८६ प्रकरणे होती. एकूण २३३ प्रकरणांचा त्वरित निपटारा करण्यात आला.
यात मोटर वाहन कायद्याची ८० प्रकरणे, एनआय अ‍ॅक्ट ९८, एमएसीटी ७, भूसंपादन ३६ व सिव्हिल ९ प्रकरणांचा समावेश आहे. लोकन्यायालयामुळे रेंगाळणारी अनेक प्रकरणे निकाली काढण्यात यश मिळाले. त्यामुळे दिवसेंदिवस लोक न्यायालयाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. लोकन्यायालयाच्या कामकाजासाठी सहा पॅनल्स तयार करण्यात आले होते. त्यावरील पॅनलच्या सदस्यांनी न्यायदानाची जबाबदारी पार पडली. सहा पॅनलमध्ये जिल्हा न्यायाधीश-१ एस.बी. गावंडे, न्यायाधीश के.एफ.एम. खान, न्यायाधीश ए.डी. मारगोडे, न्यायाधीश ए.एच. बाजड, न्यायाधीश एम.बी. सोनटक्के, न्यायाधीश जी.बी. पवार, न्यायाधीश पी.आर. फुलारी, न्यायाधीश ए.एस. शिंदे, न्यायाधीश एम.एम. वर्मा, अ‍ॅड.डी.एस. देशपांडे, डॉ. भालचंद्र देशमुख, अ‍ॅड. अर्चना मोरे, गणेश धर्माळे, अ‍ॅड.व्ही.व्ही. जामकर, प्रा. प्रदीप दुधाट, अ‍ॅड. आरती मस्के, प्रा.एस.एस. पाटील, अ‍ॅड.एन.एच. मुळे, प्रा. दिनकर गुल्हाने, अ‍ॅड.आर.एम. वाघमारे, दिनेश कदम आदींचा समावेश होता. अधीक्षक आर.यू. पाचंगे, लिपिक डी.डी. आराळे, लघुलेखक व्ही.बी. वानखेडे, आवंडकर व सहाय्यक कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

लोकन्यायालयातून त्वरित न्याय मिळतो. बरीचशी रेंगाळलेली प्रकरणे लवकर निकाली निघतात. त्यामुळे न्यायालयावरील ताण कमी होतो. ही प्रक्रिया अधिक लोकाभिमुख होण्यासाठी लोक न्यायालयाचा पक्षकारांनी लाभ घ्यावा.
- एस.बी. गावंडे,
अध्यक्ष, तालुका विधी सेवा समिती, तथा जिल्हा न्यायाधीश-१
 

Web Title: One and a half crore recovered in Pusad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :bankबँक