वृद्ध पतीने केला पत्नीचा निर्घृण खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2020 05:00 IST2020-04-19T05:00:00+5:302020-04-19T05:00:21+5:30

मीराबाई रामचंद्र देवतळे (६५) असे मृत महिलेचे नाव आहे. तर रामचंद्र भोजाजी देवतळे असे मारेकरी पतीचे नाव आहे. या दाम्पत्यात नेहमीच घरगुती कारणावरून वादविवाद होत होता. शनिवारीही दोघात कडाक्याचे भांडण झाले. त्यातच रामचंद्रने मीराबाईच्या डोक्यावर मोगरीने प्रहार केले. आधीच थकलेले वय, त्यात सततच्या भांडणामुळे वाढता मानसिक ताण आणि मोगरीचे घाव वृद्ध मीराबाई सहन करू शकली नाही.

Older husband commits brutal murder of wife | वृद्ध पतीने केला पत्नीचा निर्घृण खून

वृद्ध पतीने केला पत्नीचा निर्घृण खून

ठळक मुद्देघरगुती वाद । डोक्यात मोगरीने घातले घाव

लोकमत न्यूज नेटवर्क
माहूर : वयोवृद्ध पती-पत्नीमध्ये सतत होणाऱ्या भांडणाचे पर्यवसान शनिवारी थेट खुनात झाले. रागाच्या भरात ७० वर्षाच्या पतीने ६५ वर्षाच्या पत्नीच्या डोक्यात लाकडी मोगरीने सपासप घाव घातले. म्हातारी पत्नी रक्ताच्या थारोळ्यात कोसळली आणि गतप्राण झाली. समाजमन सुन्न करणारी ही घटना तालुक्यातील सायफळ गावात घडली.
मीराबाई रामचंद्र देवतळे (६५) असे मृत महिलेचे नाव आहे. तर रामचंद्र भोजाजी देवतळे असे मारेकरी पतीचे नाव आहे. या दाम्पत्यात नेहमीच घरगुती कारणावरून वादविवाद होत होता. शनिवारीही दोघात कडाक्याचे भांडण झाले. त्यातच रामचंद्रने मीराबाईच्या डोक्यावर मोगरीने प्रहार केले. आधीच थकलेले वय, त्यात सततच्या भांडणामुळे वाढता मानसिक ताण आणि मोगरीचे घाव वृद्ध मीराबाई सहन करू शकली नाही. गंभीर जखमी झालेल्या मीराबाईला वाईबाजार प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता तेथे डॉ. हुलसुरे यांनी तिला मृत घोषित केले.

आत्महत्येच्या प्रयत्नातील पती पोलिसांच्या तावडीत
पत्नीला मारल्यानंतर रामचंद्र आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात होता. त्यासाठी तो दातोडी शिवारातील जंगलाकडे पळाला, असे गावकऱ्यांनी सांगितले. मात्र त्याचवेळी दाखल झालेल्या शिंदखेड पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन खुनाचा गुन्हा दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक संजय चव्हाण, सहायक पोलीस निरीक्षक मल्हार शिवरकर यांनी कारवाई केली.

Web Title: Older husband commits brutal murder of wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Murderखून