दारव्हा येथे क्रेनच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:25 IST2021-07-23T04:25:46+5:302021-07-23T04:25:46+5:30

दारव्हा : क्रेनची धडक बसल्याने एका वृद्धाचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सकाळी ११ वाजता आर्णी मार्गावर घडली. प्रल्हाद ...

An old man dies in a crane crash at Darwha | दारव्हा येथे क्रेनच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू

दारव्हा येथे क्रेनच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू

दारव्हा : क्रेनची धडक बसल्याने एका वृद्धाचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सकाळी ११ वाजता आर्णी मार्गावर घडली.

प्रल्हाद श्यामजी डोमे (६५), रा. टाकळी (बु.), असे मृताचे नाव आहे. शेळ्यांच्या चारा विक्रीचा त्यांचा व्यवसाय होता. नेहमीप्रमाणे झाडांचा पाला तोडून विक्री करण्याकरिता ते सायकलने दारव्हा येथे येत होते. आर्णी मार्गावर दारव्हा ते बागवाडीदरम्यान क्रेनने त्यांना पाठीमागून जोरदार धडक दिली. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले; परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

याप्रकरणी त्यांचा पुतण्या चंदू डोमे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. प्रल्हाद डोमे यांचा मुलगा व सुनेचा २००८ मध्येच मृत्यू झाला होता. त्यामुळे रोजमजुरी करून चार नातवंडांचा उदरनिर्वाह, तसेच दोन नातींचा विवाह त्यांनी केला. त्यांच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. खड्डे चुकविण्याच्या नादात हा अपघात घडला. या खड्ड्यांमुळे त्यांना जीव गमवावा लागल्याने नागरिकांमधून रोष व्यक्त होत आहे.

220721\img-20210722-wa0004.jpg

दारव्हा येथे क्रेनच्या धडकेत व्रुध्दाचा मृत्यू

Web Title: An old man dies in a crane crash at Darwha