तेल विक्रेत्या महिलांचा रस्त्यावर धुमाकूळ

By Admin | Updated: October 7, 2014 23:41 IST2014-10-07T23:41:29+5:302014-10-07T23:41:29+5:30

येथील वर्दळीच्या व बाजार भरणाऱ्या रस्त्यावरच नागपूर येथील एका महिलेने वाताचे तेल विक्रीचे दुकान थाटले. त्यामुळे वाहतूक खोळंबली. सदर प्रकार वाहतूक पोलिसांना कळताच ते घटनास्थळी पोहचले.

Oil retailers scramble for women | तेल विक्रेत्या महिलांचा रस्त्यावर धुमाकूळ

तेल विक्रेत्या महिलांचा रस्त्यावर धुमाकूळ

नेर : येथील वर्दळीच्या व बाजार भरणाऱ्या रस्त्यावरच नागपूर येथील एका महिलेने वाताचे तेल विक्रीचे दुकान थाटले. त्यामुळे वाहतूक खोळंबली. सदर प्रकार वाहतूक पोलिसांना कळताच ते घटनास्थळी पोहचले. यावेळी या महिलेने पोलिसांनाच शिवीगाळ करणे सुरू केले. यावेळी घटनास्थळी मोठी गर्दी जमली. त्यामुळे काही काळ वाहतूक खोळंबली होती.
नेर येथे दर मंगळवारी आठवडी बाजार भरतो. आजही तो भरला होता. नागपूर येथील वातनाशक तेल विकणाऱ्या लता प्रमोद भुते (५०) व तिचा जावई गोविंद प्रेमसिंग चव्हाण व चार मुली आपल्याकडील तेल विकण्यासाठी मारोती ओमनी या कारने आले होते. त्यांनी दुपारच्या सुमारास वर्दळीच्या रस्त्यातच दुकान थाटून तेलविक्री सुरू केली. यामुळे दुतर्फा रस्त्यावरील जवळपास एक किलोमीटर अंतरापर्यंत वाहतूक खोळंबली. हा प्रकार थांबविण्यासाठी ठाणेदार गणेश भावसार व जमादार हरिचंद्र कार हे घटनास्थळी पोहोचले व त्यांनी सदर तेल विक्रेत्यांना आपले वाहन बाजुला घेण्याची सूचना केली. मात्र ही सूचना धुडकावून लावत या महिलेने ठाणेदारांच धारेवर धरले. तिच्या सोबत असलेला जावाईसुद्धा ठोणदारावर चढला आणि भर रस्त्यात वर्दी उतरविण्याची धमकी देऊन शिवीगाळ करू लागला. इथे हा प्रकार सुरू असतानाच रस्त्याच्या दोन्ही बाजुने वाहनांची रांग मात्र वाढतच होती. अखेरीस पोलिसांनी त्यांना ठाण्यात नेण्याची तयारी चालविली. आता आपले काही खरे नाही हे लक्षात आलेल्या तेल विक्रेत्यांनी पळ काढला. पोलिसांनी त्यांच्या वाहनाचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. व त्यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Oil retailers scramble for women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.