अधिकाºयांच्या बदल्यांचे वारे सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 23:32 IST2017-08-27T23:31:40+5:302017-08-27T23:32:58+5:30
उन्हाळा संपून पावसाळा सुरू झाला. आता तोही संपण्याच्या वाटेवर आहे. तरीही जिल्ह्यातील उच्चपदस्थ अधिकाºयांच्या बदल्यांचे वारे अद्याप सुरूच आहे.

अधिकाºयांच्या बदल्यांचे वारे सुरूच
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : उन्हाळा संपून पावसाळा सुरू झाला. आता तोही संपण्याच्या वाटेवर आहे. तरीही जिल्ह्यातील उच्चपदस्थ अधिकाºयांच्या बदल्यांचे वारे अद्याप सुरूच आहे.
सर्वप्रथम जिल्हा परिषदेतील अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकार, सामान्य प्रशासनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक, मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांच्या बदल्या झाल्या. त्या पाठोपाठ पंचायतचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि नंतर जिल्हा आरोग्य अधिकाºयांची बदली झाली. तत्पूर्वीच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाºयांची बदली झाली. यापैकी काही अधिकारी कार्यमुक्त होऊन बदलीच्या नवीन ठिकाणी रूजू झाले आहेत. मात्र काही अधिकारी अद्याप रिलिव्हर न आल्याने जिल्ह्यातच कार्यरत आहे.
जिल्हा परिषदेपाठोपाठ महसूल विभागातही फेरबदल झाले. पहिल्या टप्प्यात निवासी उपजिल्हाधिकारी, महसूल उपजिल्हाधिकारी, विविध प्रकल्पांचे व भूसंपादन उपजिल्हाधिकाºयांची बदली झाली. यापैकीही काही अधिकारी कार्यमुक्त झाले. नवीन अधिकारी रूजू झाले. तत्पूर्वी राज्य उत्पादन शुल्क अधीक्षकांचीही बदली झाली. आता थेट जिल्ह्याचे प्रमुख असलेल्या जिल्हाधिकाºयांची पदोन्नतीवर बदली होण्याची चर्चा सुरू आहे. येत्या काही दिवसांत जिल्हाधिकारी पदोन्नतीवर जाण्याची शक्यता वाढली आहे.
जिल्हा प्रशासनात यावर्षी मोठ्या प्रमाणात फेरबदल झाल्याने नवीन अधिकारी नव्या दमाने काम करतील, अशी अपेक्षा आहे.
यवतमाळात येण्यास अधिकारी अनुत्सुक
यावर्षी प्रथमच जिल्ह्यातील मोठ्या अधिकाºयांच्या मोठ्या प्रमाणात बदल्या झाल्या. नवीन अधिकारी रूजू झाले आहेत. मात्र जिल्ह्यात बदलून येणाºया काही अधिकाºयांना यवतमाळची अॅलजी असल्याचे स्पष्ट होत आहे. बदली होऊन दोन महिले लोटले तरीही जिल्हा परिषदेत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सामान्य प्रशासनाचे उपमुख्य कार्यकारी येण्यास यवतमाळात तयार नाही. त्यांची सतत चालढकल सुरू आहे. परिणामी कामकाजावर विपरित परिणाम होत आहे.