वणीतील कृषी केंद्र चालकांचा बंद

By Admin | Updated: February 10, 2016 03:06 IST2016-02-10T03:06:57+5:302016-02-10T03:06:57+5:30

रासायनिक खते, कीटकनाशके परवान्यासाठी आवश्यक शैक्षणिक अर्हता व जाचक अटी रद्द करण्याच्या मागणीसाठी तालुका कृषी साहित्य विक्रेता संघाने मंगळवारी एक दिवस दुकाने बंद ठेवली.

Offices of agricultural center operators closed | वणीतील कृषी केंद्र चालकांचा बंद

वणीतील कृषी केंद्र चालकांचा बंद

वणी : रासायनिक खते, कीटकनाशके परवान्यासाठी आवश्यक शैक्षणिक अर्हता व जाचक अटी रद्द करण्याच्या मागणीसाठी तालुका कृषी साहित्य विक्रेता संघाने मंगळवारी एक दिवस दुकाने बंद ठेवली.
कृषी आयुक्तांच्या परिपत्रकानुसार अधिसूचना जारी झाल्यानंतर नवीन परवाना मागणाऱ्या व्यक्तीला पदवीधर कर्मचारी नेमणूक करण्याची मूभा देण्यात आली. जुन्या परवानाधारकांना स्वत: पदवी घेण्याची सक्ती करण्यात आली. देशात कुठेही चार वर्षांच्या खाली पदवी अभ्यासक्रम नाही. अकरावी व बारावी विज्ञान विषयपात्र केल्यावर चार वर्षांच्या कृषी पदवी अभ्यासक्रमाला महाविद्यालयात दाखला मिळतो. मग दोन वर्षात स्वत:ची शैक्षणिक अर्हता जुन्या परवानाधारकांनी कशी करावी, असा प्रश्न कृषी त्यांनी उपस्थित केला आहे. कृषी केंद्रांचा व्यवसाय कणकवली पासून धानोरापर्यंत पसरला आहे. राज्याच्या ३२ जिल्ह्यांत अंदाजे ५० हजारांपेक्षा जादा कृषी केंद्र आहे. त्यापैकी केवळ दोन हजार परवानाधारक कृषी पदवीधर आहेत. उर्वरित ४८ हजार परवाराधारकांनी वेगवेगळे शिक्षण घेतले. हे परवानाधारक अनेक वर्षांपासून किटकनाशक व्यवसायात असल्यामुळे त्यांना या विषयाची जाण आहे. त्यांना विद्यार्थी म्हणून दाखला घेण्यासाठी कृषी महाविद्यालयांमध्ये जागासुद्धा उपलब्ध नाही. ३० वर्षांच्यावर वयाच्या व्यक्तीला महाविद्यालयात दाखलाही मिळत नाही. ही शैक्षणिक अट लागू झाली, तर ग्रामीण व शहरी भागातील ८० टक्के कृषी केंद्र बंद होतील. रासायनिक खतांच्या जुन्या परवानाधारकांना १० आॅक्टोबर २०१५ च्या अधिसूचनेप्रमाणे कृषी पदवी, डिप्लोमाच्या अटीतून वगळण्यात आले. कीटकनाशकांच्या ५ नोव्हेंबर २०१५ च्या पूर्वीच्या परवानाधारकांना कृषी पदवीच्या अटीतून सूट मिळावी किंवा पर्यायाने म्हणून जुन्या विक्रेत्यांकरिता किंवा त्यांनी नियुक्त केलेल्या प्रतिनिधीकरिता एक-दोन महिन्याचे प्रशिक्षण वर्ग आयोजित करून त्यांना प्रमाणपत्र द्यावे. प्रमाणपत्र पदवीऐवजी ग्राह्य धरण्यात यावे, अशी मागणी तालुका कृषी साहित्य विक्रेता संघाने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. निवेदन देताना प्रशांत पाचभाई, देवराव काकडे, उमेश राजुरकर आदी उपस्थित होते. (कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Offices of agricultural center operators closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.