अतिक्रमणाला प्रोत्साहन देणाऱ्याविरुद्ध अखेर गुन्हा
By Admin | Updated: March 18, 2017 00:40 IST2017-03-18T00:40:24+5:302017-03-18T00:40:24+5:30
एमआयडीसीतील प्रस्तावित टेक्सटाईल्स पार्कच्या ६४५ हेक्टरवरील अतिक्रमण केल्याप्रकरणी

अतिक्रमणाला प्रोत्साहन देणाऱ्याविरुद्ध अखेर गुन्हा
एमआयडीसी : पोलीस साहेबरावच्या मागावर
यवतमाळ : एमआयडीसीतील प्रस्तावित टेक्सटाईल्स पार्कच्या ६४५ हेक्टरवरील अतिक्रमण केल्याप्रकरणी उपअभियंत्यांच्या तक्रारीवरून वडगाव रोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला. यात साहेबराव जाधवला मुुख्य आरोपी बनविण्यात आले असून वडगाव रोड पोलीस त्याच्या मागावर आहेत.
लोहारा व वडगाव शिवारातील एमआयडीसी परिसरात ९ मार्चपासून नागरिकांनी अतिक्रमण करणे सुरू केले होते. जुन्या पांगरी गावठाणची जागा न्यायालयाच्या आदेशाने वितरित केली जात असल्याची बतावणी करून साहेबराव फुलसींग जाधव रा. मंगलमूर्तीनगर वडगाव रोड याने अतिक्रमण करण्याची चिथावणी दिली. नागरिकांना या जागेचे काही दस्तऐवज दाखवून त्यांच्याकडून मोठी रक्कम उकळली. हा प्रकार पोलीस करावाईतून उघड झाला. त्यामुळे एमआयडीसीचे उपअभियंता राजेंद्र चौधरी यांच्या तक्रारीवरून साहेबराव जाधव याच्याविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविला. पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण काढण्यात आले. बयाण देताना काही अतिक्रमणधारकांनी साहेबरावचे नाव घेतल्याने खरा प्रकार उघड झाला. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. (कार्यालय प्रतिनिधी)