महाराष्ट्र दिनानिमित्त ‘गर्जा महाराष्ट्र माझा’
By Admin | Updated: April 29, 2015 02:28 IST2015-04-29T02:28:30+5:302015-04-29T02:28:30+5:30
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे विचारमंच व रास्ता बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने

महाराष्ट्र दिनानिमित्त ‘गर्जा महाराष्ट्र माझा’
यवतमाळ : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे विचारमंच व रास्ता बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने गर्जा महाराष्ट्र माझा या विषयावर पोस्टल मैदानात सायंकाळी ६ वाजता व्याख्यान आयोजित केले आहे. लेखक, नाटककार प्रा. नितीन बानगुडे पाटील मार्गदर्शन करणार आहे.
बानगुडे पाटील यांची छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, जगनं समाजासाठी, आई नातं संस्काराचं या विषयांवर पाच हजारांपेक्षा अधिक व्याख्याने झाली आहेत. माझा महाराष्ट्र या गजालेल्या मराठी गीतांचा कार्यक्रम स्थानिक कलावंत श्रीकांत टपले सादर करणार आहेत. कार्यक्रमासाठी पालकमंत्री संजय राठोड, खासदार भावना गवळी यांच्यासह शहरातील अनेक गणमान्य व्यक्ती उपस्थित राहणार
आहेत.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी संयोजक शिवसेना शहर प्रमुख पराग पिंगळे यांनी पुढाकार घेतला. याशिवाय बाळासाहेब मुंगीनवार, विश्वास नांदेकर, परमानंद अग्रवाल, बाबू जैत, प्रवीण पांडे, राजेंद्र गायकवाड, संतोष ढवळे, अतुल कुमटकर, अजिंक्य मोटके, अतुल बोबडे, चंद्रकांत पवार यांनी परिश्रम घेतले. (कार्यालय प्रतिनिधी)