ज्योत्स्ना दर्डा जन्मदिनानिमित्त आज प्रेरणास्थळावर ‘स्मृतिरंग’
By Admin | Updated: June 18, 2015 02:03 IST2015-06-18T02:03:17+5:302015-06-18T02:03:17+5:30
लोकमत सखी मंचच्या संस्थापक अध्यक्ष आणि संगीतावर निस्सीम प्रेम करणाऱ्या ज्योत्स्ना दर्डा यांच्या

ज्योत्स्ना दर्डा जन्मदिनानिमित्त आज प्रेरणास्थळावर ‘स्मृतिरंग’
संगीतसंध्या : यशश्री भावे-पाठक व सागर मधुमटके यांचे गायन
यवतमाळ : लोकमत सखी मंचच्या संस्थापक अध्यक्ष आणि संगीतावर निस्सीम प्रेम करणाऱ्या ज्योत्स्ना दर्डा यांच्या जन्मदिनानिमित्त ‘स्मृतिरंग’ या संगीतसंध्या कार्यक्रमाचे आयोजन गुरुवार, १८ जूनला सायंकाळी ६.३० वाजता येथील प्रेरणास्थळावर करण्यात आले आहे.
विदर्भाचे किशोरकुमार म्हणून नावलौकिक असलेले सुप्रसिद्ध गायक सागर मधुमटके आणि इंडियन आॅयडॉलमध्ये नागपूरचे नाव चमकविणारी गुणी गायिका यशश्री भावे-पाठक आपल्या विशिष्ट गायनाद्वारे श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणार आहे. जुन्या-नव्या हिंदी आणि मराठी गीतांच्या या कार्यक्रमाला वेगळाच साज आणि आठवणींचा सुगंध लाभणार आहे.
संगीत संयोजन यवतमाळातील संगीतकार बाबा-किशोर यांचा नटराज आॅर्केस्ट्रा करणार आहे. निवेदन अनुजा घाडगे यांचे असतील. हा कार्यक्रम सर्वांसाठीच खुला आहे. याचा रसिकांनी लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे. (वार्ताहर)
महिलांसाठी विविध स्पर्धा
सखी मंचच्या संस्थापक अध्यक्षा ज्योत्स्रा दर्डा यांच्या जन्मदिनानिमित्त १८ जून रोजी दर्डा मातोश्री सभागृहात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी केक सजावट स्पर्धा, भाषण स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, दिया सजाओ स्पर्धा, दुपारी ३ ते ४ या वेळात तर ८ ते १८ वयोगटातील मुलींसाठी भूले-बिसरे गीत गायन स्पर्धा दुपारी ४ वाजता आयोजित आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना याच दिवशी प्रेरणास्थळावर आयोजित कार्यक्रमात बक्षीस वितरण केले जाणार आहे. स्पर्धा आणि कार्यक्रमात सहभागी होण्याची विनंती करण्यात आली आहे.
पाऊस आल्यास कार्यक्रम ‘मातोश्री’ सभागृहात
‘स्मृतिरंग’ या कार्यक्रमाचे नियोजित स्थळ प्रेरणास्थळ आहे. मात्र यावेळी पाऊस आल्यास हा कार्यक्रम दर्डा मातोश्री सभागृहात घेण्यात येईल, असे आयोजकांनी कळविले आहे.