ओबीसी, एसबीसी, व्हीजेएनटी आंदोलन फ्रंटची जागृती मोहीम
By Admin | Updated: August 16, 2014 23:43 IST2014-08-16T23:43:38+5:302014-08-16T23:43:38+5:30
ओबीसी, एसबीसी, व्हीजेएनटी आंदोलन फं्रटच्यावतीने तीन दिवस सामाजिक न्याय भवनासमोर घेराव आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाच्या माध्यमातून हक्काबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती झाली आहे.

ओबीसी, एसबीसी, व्हीजेएनटी आंदोलन फ्रंटची जागृती मोहीम
यवतमाळ : ओबीसी, एसबीसी, व्हीजेएनटी आंदोलन फं्रटच्यावतीने तीन दिवस सामाजिक न्याय भवनासमोर घेराव आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाच्या माध्यमातून हक्काबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती झाली आहे. आता यापुढे ही मोहीम आर्णी विधानसभेत राबविणार असल्याचे फ्रंटचे सदस्य देवानंद पवार यांनी पत्रपरिषदेत सांगितली. यावेळी डॉ. दिलीप महाले, ज्ञानेश्वर गोबरे, राजेश मुके, संजय मादेशवार, उत्तम गुल्हाने, मायाताई गोबरे, योगेश धानोरकर, साहेबराव पवार उपस्थित होते.
ओबीसी, एसबीसी, व्हीजेएनटीच्या अधिकारावर गदा आणली जात आहे. सामाजिक न्यायमंत्री आदिवासींच्या हक्कासाठी स्वत: रस्त्यावर उतरत आहे. मात्र दुसरीकडे ओबीसी, एसबीसी, व्हीजेएनटीच्या मागण्यांकडे मात्र पद्धतशीरपणे दुर्लक्ष करत आहे. पालकमंत्री शिवाजीराव मोघे यांना विश्रामगृहात घेराव घालण्याचा प्रयत्न केला असता ते मागच्या दाराने निघून गेले. मागण्या पूर्ण होईपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार आहे. जिल्ह्यात ओबीसींना १९ टक्के आरक्षण, जातीनिहाय जनगणना, सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना व वरील प्रवर्गासाठी स्वतंत्र वसतिगृह अशा प्रमुख मागण्या करण्यात आलेल्या आहे. आता यासाठी घरोघरी जावून जागृती केली जाणार आहे. याची सुरुवात सामाजिक न्यायमंत्र्याच्या विधानसभा क्षेत्रातून करणार असल्याचे देवानंद पवार यांनी यावेळी पत्रपरिषदेत सांगितले. (कार्यालय प्रतिनिधी)