वणीत कोरोना रूग्णांची संख्या झाली सहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 05:00 IST2020-06-25T05:00:00+5:302020-06-25T05:00:27+5:30

कोरोनाच्या उद्रेकानंतर वणी, मारेगाव, झरी व पांढरकवडा हे चार तालुके कोरोनामुक्त होते. परंतु मुंबईवरून वणीत आलेल्या एका कुटुंबातील तिघेजण कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने वणीत कोरोनाचा शिरकाव झाला. या बाधित व्यक्तींच्या थेट संपर्कात आलेल्या ५९ जणांना परसोडा येथे कोव्हिड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यातील दोघांचे मंगळवारी, तर बुधवारी एकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. या तिघांपैकी एका वृद्ध महिलेला घरातच क्वारंटाईन करण्यात आले आहे.

The number of corona patients in Wani was six | वणीत कोरोना रूग्णांची संख्या झाली सहा

वणीत कोरोना रूग्णांची संख्या झाली सहा

ठळक मुद्देधोका वाढतोय : प्रतिबंधित क्षेत्रात केली वाढ, थेट कनेक्शन असलेल्यांचा शोध

लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : बुधवारी पॉझिटिव्ह रूग्णांच्या संख्येत एकाने वाढ झाल्यामुळे वणीतील रूग्णांची संख्या आता सहा झाली आहे. त्यामुळे प्रशासनासह वणीकर नागरिकांची चिंता वाढली आहे.
कोरोनाच्या उद्रेकानंतर वणी, मारेगाव, झरी व पांढरकवडा हे चार तालुके कोरोनामुक्त होते. परंतु मुंबईवरून वणीत आलेल्या एका कुटुंबातील तिघेजण कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने वणीत कोरोनाचा शिरकाव झाला. या बाधित व्यक्तींच्या थेट संपर्कात आलेल्या ५९ जणांना परसोडा येथे कोव्हिड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यातील दोघांचे मंगळवारी, तर बुधवारी एकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. या तिघांपैकी एका वृद्ध महिलेला घरातच क्वारंटाईन करण्यात आले आहे. बाधित झालेल्या या तिघांनाही बुधवारी दुपारी उपचारासाठी यवतमाळ येथे रवाना करण्यात आले. परसोडा येथील कोव्हिड सेंटरमध्ये असलेल्या उर्वरित व्यक्तींचे रिपोर्ट अद्याप अप्राप्त आहे.
वणीत दररोज पॉझिटिव्ह रूग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने नागरिक आता दहशतीखाली आले आहेत. कोरोनाचा शिरकाव झाल्याने प्रशासनही खबरदारी घेत आहे. महत्वाचे काम असेल, तरच घराबाहेर पडा अन्यथा स्वत:च्या व कुटुंबाच्या सुरक्षेसाठी घरातच थांबा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी डॉ.शरद जावळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक, तहसीलदार श्याम धनमने, ठाणेदार वैभव जाधव यांनी वणीकरांना केले आहे.
पॉझिटिव्ह आढळलेल्या तीन रूग्णांवर नागपूर येथील रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या तिघांच्याही प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती आहे. वणीत कोरोनाचा शिरकाव झाल्याने आता बाहेरगावावरून येणाऱ्या नागरिकांची तपासणी व त्यांना होम क्वारंटाईन करणे गरजेचे झाले आहे. अनेकजण होम क्वारंटाईन केल्यानंतरही घराबाहेर पडत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे प्रशासनाने अशा व्यक्तींवर ‘वॉच’ ठेवावा, अशी मागणीही आता पुढे येत आहे.

वणी शहरातील गर्दी झाली अनियंत्रित
वणी शहरात कोरोनाचा शिरकाव होण्यापूर्वी बाजारपेठेमध्ये नागरिकांची प्रचंड गर्दी दिसून येत होती. कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतरही या गर्दीवर कोणताही परिणाम झाल्याचे दिसून येत नाही. कोरोनापासून स्वत:चा बचाव करायचा असेल, तर तोंडावर मास्क, सॅनीटायझरचा वापर व सामाजिक अंतर पाळणे, हे उपाय आहे.

Web Title: The number of corona patients in Wani was six

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.