ॲक्टिव्ह कोरोना रुग्णसंख्या चक्क हजाराच्याही खाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 05:00 IST2021-06-04T05:00:00+5:302021-06-04T05:00:14+5:30
जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार, गुरूवारी एकूण ४६०५ जणांचे अहवाल प्राप्त झाले. यापैकी ८१ जण नव्याने पॉझिटिव्ह आले. तर ४५२४ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात ९९० रुग्ण ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह आहेत. यापैकी ४८५ रुग्ण रुग्णालयात भरती आहेत. तर ५०५ गृह विलगीकरणात आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७२ हजार १७९ झाली आहे.

ॲक्टिव्ह कोरोना रुग्णसंख्या चक्क हजाराच्याही खाली
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यात दोन महिन्यांपूर्वी कोरोनाच्या ॲक्टिव्ह रुग्णांचा आकडा तब्बल सात हजारांच्या पार गेला होता. मात्र आता ही संख्या आटोक्यात असून सध्या जिल्ह्यात केवळ ९९० रुग्ण आहेत. त्यातील केवळ साडेचारशे रुग्ण दवाखान्यात आहेत. गुरुवारी दिवसभरात दोघांचा मृत्यू झाला. ८१ जणांचा अहवाल नव्याने पॉझिटिव्ह आला तर १७५ जण कोरोनामुक्त झाले.
यवतमाळ शहरातील ५९ वर्षीय पुरूषाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात, तर वणी तालुक्यातील ७२ वर्षीय महिलेचा खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. दिवसभरात पॉझिटिव्ह आलेल्या ८१ जणांमध्ये ५१पुरुष आणि ३० महिला आहेत. यात आर्णी येथील १, बाभूळगाव येथील ४, दारव्हा येथील २, दिग्रस येथील ११, घाटंजी २, कळंब ०, महागाव येथील ३, मारेगाव येथील ३, नेर येथील ७, पांढरकवडा ६, पुसद येथील १४, राळेगाव १, वणी येथील १४, यवतमाळ ८ तर झरीजामणी येथील २ रुग्णांचा समावेश आहे.
जिल्हयात आतापर्यंतत सहा लाख ३५ हजार ३७३ चाचण्या झाल्या. त्यापैकी पाच लाख ६२ हजार २५७ निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर ११.३६ असून दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर १.७६ आहे. तर मृत्युदर २.४५ इतका आहे.
मात्र जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण बऱ्याच प्रमाणात कमी झाले तरी कोरोना पूर्णत: संपलेला नाही. बुधवारी जिल्ह्यात कोरोनाचा एकही बळी नोंदविला गेला नव्हता. त्यामळे मोठा दिलासा मिळाला होता. मात्र लगेच गुरुवारी दोन मृत्यू झाल्याने काळजी संपलेली नसल्याचे स्पष्ट झाले.
जिल्ह्यात आतापर्यंत १७७० जणांच्या मृत्यूची नोंद
- जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार, गुरूवारी एकूण ४६०५ जणांचे अहवाल प्राप्त झाले. यापैकी ८१ जण नव्याने पॉझिटिव्ह आले. तर ४५२४ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात ९९० रुग्ण ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह आहेत. यापैकी ४८५ रुग्ण रुग्णालयात भरती आहेत. तर ५०५ गृह विलगीकरणात आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७२ हजार १७९ झाली आहे. २४ तासात १७५ जण कोराेनामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या ६९ हजार ४१९ आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १७७० मृत्यूची नोंद आहे.