‘जेडीआयईटी’मध्ये आज ‘एनटीपीसी १६’
By Admin | Updated: July 29, 2016 02:21 IST2016-07-29T02:21:28+5:302016-07-29T02:21:28+5:30
येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाचा परमाणु व दूरसंचार विभाग तसेच आयईटीई यवतमाळ सबसेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने

‘जेडीआयईटी’मध्ये आज ‘एनटीपीसी १६’
यवतमाळ : येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाचा परमाणु व दूरसंचार विभाग तसेच आयईटीई यवतमाळ सबसेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने नॅशनल टेक्नीकल पेपर कान्टेस्ट २०१६ (एनटीपीसी-१६) चे आयोजन २९ जुलै रोजी करण्यात आले आहे.
राष्ट्रीय पातळीवर आयोजित या स्पर्धेमध्ये देशातील विविध राज्यातून सुमारे ४० महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी एकूण १३७ शोधनिबंध नोंदवून उत्स्फूर्त सहभाग घेतला आहे. सहभागी चमूंच्या शोधनिबंधांचे मूल्यांकन राज्यातील विविध महाविद्यालयातील सुमारे ५० तज्ज्ञ परिक्षकांचे हस्ते करण्यात आले. या मूल्यांकनाद्वारे सादरीकरणाकरिता निवडलेल्या सर्वोत्कृष्ट प्रथम पाच शोधनिबंधांमध्ये नवी दिल्ली अलाहबाद, कोलकाता व महाराष्ट्रातील शोधनिबंधांचा समावेश आहे.
या विद्यार्थ्यांच्या शोधनिबंधांचे सादरीकरण महाविद्यालयामध्ये होणार असून यातील सर्वोत्कृष्ट तीन शोधनिबंधांना आयईटीई नवी दिल्ली येथे सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या ‘एटीसी २०१६’ या सोहळ्यामध्ये रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.
याप्रसंगी ‘जेडीईएस’ संस्थेचे सचिव किशोर दर्डा, आयईटीई नवी दिल्लीचे झोनल कोआॅर्डिनेटर (पश्चिम विभाग) डॉ. जे.डब्ल्यू. बाकल, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे अभियांत्रिकी विभागाचे अधिष्ठाता डॉ. जी.आर. बामनोटे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. डब्ल्यू. कोल्हटकर, आयईटीई अमरावती केंद्राचे अध्यक्ष डॉ. पी. व्ही. इंगोले, आयईटीई यवतमाळ उपकेंद्राचे अध्यक्ष डॉ. एस. एम. गुल्हाने, आयईटीई अमरावती केंद्राचे सचिव प्रा. ए. बी. देशमुख, आयईटीई यवतमाळ उपकेंद्राचे सचिव प्रा. पी. एम. पंडित, तसेच आयईटीईचे विविध पदाधिकारी, सदस्य, विशेष निमंत्रित व तज्ज्ञ परिक्षक उपस्थित राहणार आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)