आता पॅकेजचे बियाणेही बोगस
By Admin | Updated: July 30, 2014 00:03 IST2014-07-30T00:03:41+5:302014-07-30T00:03:41+5:30
विविध कंपन्यांचे सोयाबीन बियाणे बोगस निघाल्याच्या तक्रारी कृषी विभागाकडे झाल्या आहे. आता पॅकेजचे बियाणेही बोगस असल्याच्या बाबी पुढे येत आहे. अशा प्रकारच्या बहुतांश तक्रारी कृषी विभागाकडे

आता पॅकेजचे बियाणेही बोगस
नेर : विविध कंपन्यांचे सोयाबीन बियाणे बोगस निघाल्याच्या तक्रारी कृषी विभागाकडे झाल्या आहे. आता पॅकेजचे बियाणेही बोगस असल्याच्या बाबी पुढे येत आहे. अशा प्रकारच्या बहुतांश तक्रारी कृषी विभागाकडे दाखल झाल्या आहेत. उगवण क्षमता नसतानाही संबंधितांनी बियाणे प्रमाणित कसे केले असा प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे.
तालुक्यात ‘एसीएन’ सोयाबीन बियाणे बोगस निघाल्याच्या तक्रारी होत्या. दरम्यान शेतकऱ्यांना कृषी विभागाने पॅकेजचे बियाणे वाटप केले. एकाच गावातील १०० बॅग बियाणे उगवलेच नाही. आता त्यांना दुबार पेरणी करावी लागणार आहे.
एकीकडे ‘एसीएन’ या सोयाबीन बियाणे कंपनीने शेतकऱ्यांची घोर फसवणूक केली आहे. तर दुसरीकडे शासनाच्या बियाण्यांचीही गत अशीच आहे. जमिनीत भरपूर ओल असतानाही पॅकेजचे बीज अंकुरले नाहीत. तालुक्याच्या मालखेड(बु) या एकाच गावात पॅकेजच्या १०० बॅगचे बियाणे वाटप झाले होते. ते सर्व बोगस निघाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.
सदर शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईसाठी कृषी विभागाकडे तक्रार केली आहे. अंगद भोयर, सुमित्रा भोयर, प्रणिता ढोके, मोहन ढोके, विनायक गावंडे, विश्वनाथ धोटे, सचिन भोयर, रितेश जामनकर, गणेश जामनकर, मधुकर जामनकर, शेख याकुब शेख मेहबूब, शेख मुस्तफा शेख बशीर, शेख नबी शेख कासम, मासूमबी अब्दुल रहेमान, शेख वजीर शेख रहेमान, देवेंद्र माहुरे, प्रल्हाद उईके, अश्विन काकडे आदी शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रार केली आहे. यावर तत्काळ कारवाई करून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)