दाभडी गावाच्या विकासासाठी आता ‘आप’चाही पुढाकार
By Admin | Updated: July 2, 2015 02:51 IST2015-07-02T02:51:19+5:302015-07-02T02:51:19+5:30
देशातील अनेक थोरामोठ्यांनी भेट देऊन विकासाचे आश्वासन दिलेल्या जिल्ह्यातील दाभडी गावाचा चेहरामोहरा बदलविण्यासाठी आता आम आदमी पार्टीही सरसावली आहे.

दाभडी गावाच्या विकासासाठी आता ‘आप’चाही पुढाकार
यवतमाळ : देशातील अनेक थोरामोठ्यांनी भेट देऊन विकासाचे आश्वासन दिलेल्या जिल्ह्यातील दाभडी गावाचा चेहरामोहरा बदलविण्यासाठी आता आम आदमी पार्टीही सरसावली आहे. या गावाच्या संपूर्ण विकासाचा आम्ही ध्यास घेतला असून त्याचे परिणाम येत्या पाच-सहा महिन्यात आपल्याला दिसतील, अशी माहिती बुधवारी पत्रपरिषदेत आम आदमी पार्टीचे राज्यस्तरीय नेते रवी श्रीवास्तव यांनी दिली.
आम आदमी पार्टीची राज्यस्तरीय चमू सध्या यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून आर्णी तालुक्यातील दाभडी या गावाचा त्यांनी दौरा केला. त्यानंतर त्यांनी हे गाव विकासासाठी दत्तक घेतल्याचे सांगितले. या दरम्यान त्यांना या गावातील समस्या पत्रपरिषदेत कथन केले. सुंदर बालकृष्णन् यांनी दिलेल्या माहितीनुसार दाभडी येथे विविध समस्या मोठ्या प्रमाणात आहे. बहुतांश कुटुंबीयांकडे राशनकार्डदेखील उपलब्ध नसल्याचे ते म्हणाले. (प्रतिनिधी)