मुद्रांक शुल्क अपहारात चौघांना नोटीस

By Admin | Updated: November 26, 2014 23:13 IST2014-11-26T23:13:43+5:302014-11-26T23:13:43+5:30

यवतमाळ पंचायत समितीमध्ये २००९ ते २०१३ या कालावधीत कोट्यवधी रुपयांच्या मुद्रांक शुल्काचा अपहार केल्याची बाब पुढे आली होती. या प्रकरणाची चौकशी सुरू असून दोषी पंचायत विस्तार

Notice to stamp duty hijackers for four | मुद्रांक शुल्क अपहारात चौघांना नोटीस

मुद्रांक शुल्क अपहारात चौघांना नोटीस

यवतमाळ : यवतमाळ पंचायत समितीमध्ये २००९ ते २०१३ या कालावधीत कोट्यवधी रुपयांच्या मुद्रांक शुल्काचा अपहार केल्याची बाब पुढे आली होती. या प्रकरणाची चौकशी सुरू असून दोषी पंचायत विस्तार अधिकारी आणि ग्रामसेवकांना नोटीस बजावण्यात आली आहे.
यवतमाळ तालुक्यातील १५ ग्रामपंचायतींच्या मुद्रांक शुल्काच्या रकमेची पद्धतशीरपणे परस्पर विल्हेवाट लावण्यात आली. याच प्रकरणात तत्कालिन विस्तार अधिकारी पंचायत पी.जी. पारवे, लोहाराचे ग्रामसचिव यू.एम. माने, पिंपळगाव, यवतमाळ ग्रामीणचे ग्रामसचिव आर.जी. कोराम यांना ही नोटीस देण्यात आली आहे. या अपहाराच्या प्रकरणाची अजूनही चौकशी सुरू असून रेकॉर्ड तपासले जात आहे. मुद्रांक शुल्क प्रकरणात गुरफटलेल्या एका अधिकाऱ्याला अभय देण्यासाठी पद्धतशीरपणे २०१२-१३ या कालावधीतील मुद्रांक शुल्क वितरणाची चौकशी करण्यात आलेली नाही. या प्रकरणात चौकशी झाल्यास अधिकारी अडकण्याची शक्यता आहे. (कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Notice to stamp duty hijackers for four

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.