‘चाणक्य’ला अखेर जिल्हाधिकाऱ्यांची नोटीसशैक्षणिक सॉफ्टवेअर : आमदार निधीतील २५ लाखांचे प्रकरण

By Admin | Updated: February 10, 2016 03:14 IST2016-02-10T03:14:38+5:302016-02-10T03:14:38+5:30

विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी स्थानिक आमदार विकास निधीतून १०० शाळांना पुरविण्यात आलेल्या शैक्षणिक साहित्य सॉफ्टवेअरचे गौडबंगाल ‘लोकमत’ने पुढे आणले असून,

Notice of District Collector's Officials 'Chanakya': 25 lakh cases of MLA fund | ‘चाणक्य’ला अखेर जिल्हाधिकाऱ्यांची नोटीसशैक्षणिक सॉफ्टवेअर : आमदार निधीतील २५ लाखांचे प्रकरण

‘चाणक्य’ला अखेर जिल्हाधिकाऱ्यांची नोटीसशैक्षणिक सॉफ्टवेअर : आमदार निधीतील २५ लाखांचे प्रकरण

महागाव : विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी स्थानिक आमदार विकास निधीतून १०० शाळांना पुरविण्यात आलेल्या शैक्षणिक साहित्य सॉफ्टवेअरचे गौडबंगाल ‘लोकमत’ने पुढे आणले असून, याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी चाणक्य नेट स्टडी डॉट कॉमला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. २५ लाखाच्या आमदार विकासनिधीचा गैरवापर झाल्याचा आरोप होत आहे.
महागाव आणि उमरखेड तालुक्यातील सुमारे १०० शाळांना शैक्षणिक सॉफ्टवेअर पुरविण्याचा निर्णय झाला. त्यासाठी स्थानिक आमदार निधीतून २५ लाख रुपये मंजूर करण्यात आले. साहित्य पुरविण्याचे कंत्राट अहमदनगर येथील चाणाक्य नेट स्टडी डॉट कॉमला देण्यात आले. त्यांनी शासकीय नियमांची पायमल्ली करत सॉफ्टवेअर न देताच बिल काढले होते. याबाबत सर्व प्रथम ‘लोकमत’ने ७ डिसेंबर रोजी सॉफ्टवेअर खरेदीचे गौडबंगाल’ असे वृत्त प्रकाशित केले होते. याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी चाणाक्यच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. सॉफ्टवेअरचा पुरवठा आणि उपयोगितेचा वस्तुनिष्ठ अहवाल सात दिवसात सादर करण्याचे या नोटीसमध्ये म्हटले आहे. त्यामुळे चाणाक्याचे चांगलेच धाबे दणाणले आहे. महागाव आणि उमरखेड तालुक्यात शैक्षणिक सत्र संपत आले तरी सॉफ्टवेअर मिळाले नाही. याबाबत काही शाळांनी तक्रारी दाखल केल्या आहेत. तर सॉफ्टवेअर पुरविलेल्या शाळांना आवश्यक क्षमतेचे साहित्य दिले नाही. याबाबत माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडून अहवाल येणे अपेक्षित होते. परंतु शाळांची निवड कशी झाली याबाबत खुद्द शिक्षणाधिकाऱ्यांच माहिती नाही. जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांच्या पत्रानुसार २४ सप्टेंबरपर्यंत अहवाल सादर करावयाचा होता, परंतु तो अहवाल सादर केला नाही. याला सहा महिने लोटले आहे. अखेर जिल्हाधिकारी यांनी होत असलेल्या विलंबाबाबत २५ लाख रुपये वसुलीची नोटीस बजावली आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Notice of District Collector's Officials 'Chanakya': 25 lakh cases of MLA fund

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.