सहायक आयुक्तांंना नोटीस
By Admin | Updated: October 30, 2016 00:13 IST2016-10-30T00:13:34+5:302016-10-30T00:13:34+5:30
बदली प्रकरणात मॅटच्या आदेशाचा सोयीस्कर अर्थ लावून परस्पर रूजू होणाऱ्या समाजकल्याणच्या सहायक आयुक्ताला

सहायक आयुक्तांंना नोटीस
समाजकल्याण : शिस्तभंग केल्याचा ठपका
यवतमाळ : बदली प्रकरणात मॅटच्या आदेशाचा सोयीस्कर अर्थ लावून परस्पर रूजू होणाऱ्या समाजकल्याणच्या सहायक आयुक्ताला प्रादेशिक उपायुक्तांनी शिस्तभंगाची कारवाई कार करण्यात येऊ, नये अशी नोटीस बजावली आहे. कर्मचाऱ्याच्या सहाव्य वेतन आयोगातील फरकाच्या रकमेत अनियमतीत केल्याचा ठपका सहायक आयुक्तावर ठेवण्यात आला होता. शिक्षक आमदारांच्या तक्ररीवरून सहायक आयुक्ताची अकोला जिल्हा परिषदेत बदली झाली होती.
यवतमाळ जिल्हा परिषद आणि समाजकल्याण विभागात कार्यरत असताना सदैव कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असलेले विजय साळवे पुन्हा एका वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. समाजकल्याण विभागात सहायक आयुक्त म्हणून काम करत असताना साळवे यांनी समाजकार्य महाविद्यालय पुसद आणि यवतमाळ येथील कर्मचाऱ्यांच्या सहाव्या वेतन आयोगातील अरीअस देण्यास टाळाटाळ केली होती. याची तक्रार शिक्षक आमदारांनी समाजकल्याण मंत्र्यांकडे केली. त्यावरून विजय साळवे यांची अकोला येथे बदली करण्यात आली. साळवे यांनी बदली विरोधात मॅटमध्ये धाव घेतली. मॅटने हे प्रकरण सिव्हील बोर्डापुढे सुनावणीसाठी ठेवून पुन्हा निर्णय घ्यावा असा आदेश दिला. दरम्यान दोन महिन्याच्या काळात यवतमाळचे कामकाज प्रभारावर सुरू होते. मॅटने २१ आॅक्टोबरला आदेश देताच विजय साळवे हे परस्पर यवतमाळात रूजू झाले. त्यांनी शासनाच्या कोणत्याही आदेशाची वाट न पाहता, आपण रूजू झाल्याचा अहवाल प्रादेशीक उपायुक्ताकडे पाठवीला. त्यावर प्रादेशिक उपायुक्तांनी साळवे यांना २५ आॅक्टोबर रोजी शिस्तभंगाची कारवाई का करण्यात येऊ नये, अशी नोटीस बजावली आहे. त्यानंतरही साळवे यवतमाळाता कार्यरत आहे. आदेशाची वाट न पाहता थेट रूजू होण्या मागे काय गौडबंगाला आहे याची चर्चा समाजकल्याण विभागाच्या वर्तुळात सुरू आहे. (कार्यालय प्रतिनिधी)