नोडल अधिकाऱ्यांचा शेतकऱ्यांशी संवाद
By Admin | Updated: September 10, 2016 00:54 IST2016-09-10T00:54:24+5:302016-09-10T00:54:24+5:30
जिल्ह्यातील सात महसूल विभागात १०१ मंडळ असून प्रत्येक मंडळासाठी वर्ग एक व वर्ग दोनचे अधिकारी संपर्क अधिकारी

नोडल अधिकाऱ्यांचा शेतकऱ्यांशी संवाद
अडचणी सुटतील : योजनांचा लाभ मिळेल
यवतमाळ : जिल्ह्यातील सात महसूल विभागात १०१ मंडळ असून प्रत्येक मंडळासाठी वर्ग एक व वर्ग दोनचे अधिकारी संपर्क अधिकारी म्हणून जिल्हात प्रशासनाकडून नेमण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्याच्या समस्या जाणून घेणे, त्यांना येणाऱ्या अडचणी तातडीने निकाली निघाव्यात यासाठी अधिकारी संपर्क अधिकारी म्हणून आता काम पाहत आहेत. संपर्क अधिकाऱ्यांनी महिन्यातून दोन ते तीन वेळा मंडळातील गावांना भेटी दिल्या असून शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यात येत आहेत.
जिल्हयात सात उपविभागात १०१ मंडळे असून यातील महसुली गावांची जबाबदारी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आली आहे. त्यामुळे गावामध्ये जावून शेतकऱ्यांच्या अडचणी, समस्या सोडवणूक करण्यात येत आहे. शासनाच्या इतर विभागांच्या योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळवून देण्यात येईल. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना भेटी देणे, ग्रामस्तरीय समितीकडून योग्य, लाभार्थ्यांंची निवड करण्यात आली की नाही हे तपासण्यात येत आहे. तसेच योग्य लाभार्थ्यांची निवड करणे, मंडळातील कृषी सहायक, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील, मंडळ अधिकारी, कोतवाल यांची बैठक घेउन शेतकऱ्यांच्या समस्या निकाली काढणे, शेतकरी, सामान्य नागरिक यांच्या वैयक्तीक लाभाच्या योजनांसाठी मंडळस्तरावर मेळावे आयोजित करणे, शेतकऱ्यांना जोडधंद्याचे प्रशिक्षण व तांत्रिक मार्गदर्शन करणे, मंडळात येत असलेल्या अडचणींचा पाठपुरावा संबंधीत विभागाकडे करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)